खरीप हंगाम 2022 मधील पीकविमा देण्यात यावा
भादा येथे शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन
भादा प्रतिनिधी खरीप हंगाम 2022मधील पीकविमा देण्यात यावा यासाठी पीकविमा कंपनीच्या मंगळवारी शेतकन्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. यावेळी विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांची भेट घेत पीकविमा मंजूर झालेला असल्याचे सांगितले.
मागील वर्षीपासून भादा येथील शेतकरी पीकविम्यासाठी कंपनीकडे -पाठपुरावा करीत आहेत. मात्र, त्याकडे
दुर्लक्ष केले जात होते. यापूर्वी पीकविमा कंपनी शेतकरी आणि जिल्हाधिकारी यांची बैठकही पार पडली होती. मात्र, निषेधार्थ भादा येथील शेतकरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम राहिले. स्वातंत्र्यदिनी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. त्यामुळे विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करून भादा महसूल मंडळाला पीकविमा मंजूर झाला असल्याचे जाहीर केले. आंदोलनाच्या ठिकाणी भादा पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.