*
उदगीर व वाढवणा येथे हातभट्टी दारू तयार करणाऱ्या ठिकाणावर छापा, 1 लाख 5 हजाराचा मुद्देमाल नाश, 04 गुन्हे दाखल. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.*
लातूर (प्रतिनिधी ) या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, सण उत्सवाच्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यात अवैध रीतीने हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने उदगीर व वाढवणा पोलीस ठाण्याचे हद्दीमध्ये अवैधरित्या हातभट्टी दारू तयार करणारे इसमावर दिनांक 24/09/2023 रोजी सकाळी छापामारी केली. यामध्ये 1750 लिटर रसायन ,साहित्य, हातभट्टीची दारू असा एकूण किंमत 1 लाख 5 हजार रुपयेचे रसायन,हातभट्टीदारू आणि हातभट्टी निर्मिती चे साहित्य नाश करण्यात आले आहे. या कार्यवाहीत
1) संतोष रतन पवार
2)चंद्रकांत ठाकूर राठोड
3) दिलीप देवराव पवार
4)लक्ष्मण भीमराव पवार, सर्व राहणार उदगीर.
अशा क्रमांक 1 ते 3 आरोपीवर पो.ठाणे वाढवणा येथे व क्रमांक 4 याच्यावर पोलीस ठाणे उदगीर येथे कलम 65(ड)(ई) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे एकूण 4 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथक मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड, पोलीस अमलदार राहुल सोनकांबळे, कोळसुरे, प्रकाश भोसले, सिद्धेश्वर जाधव, नितीन कठारे, मनोज खोसे, राहुल कांबळे, नकुल पाटील, चंद्रकांत केंद्रे यांनी केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.