राज्याच्या कृषीमंत्र्यांना अभ्यास करण्याची गरज - संतोष सोमवंशीvऔशातील बंदला उस्फूर्त प्रतिसाद
औसा : सोयाबीनच्या उत्पादनात राज्यात पहिल्या असणाऱ्या लातूर जिल्ह्यातून देशातील सोयाबीनचा दर ठरविण्यात येतो.असे असतानाही राज्य सरकारने लातूरातील मंजूर करण्याची घोषणा केली असताना सोयाबीन संशोधन केंद्र परळीला हलविण्यात आले.हा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर सरकारने केलेला अन्याय आहे. आम्ही याचा जाहीर निषेध करतो.यासह राज्याच्या कृषी मंत्र्यांना अभ्यास करण्याची गरज असून शेतकऱ्याच्या बाबतीत निर्णय घेताना असा बालीशपणा करु नका,कोणते पिक कुठे पिकते.याचा परीपूर्ण माहिती घेवूनच निर्णय घ्यावा.अन्यथा लातूर जिल्ह्यात पाऊल टाकू देणार नसल्याचा इशारा औशातील आंदोलनात बोलताना राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांनी दिली. शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या वतीने लातूरात सोयाबीन संशोधन केंद्र व्हावे,या मागणीसह सरकारच्या निर्णयाचे निषेध करत औशातील आडत बाजारपेठ बंद ठेवन्यात आली.
संतोष सोमवंशी यांच्या नेृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यात सरकार विरोधात निषेध आंदोलन करण्यात येत आहे.यानिमित्त आज सकाळी ११ वाजता औसा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती च्या कार्यालय समोर आक्रमक शिवसैनिकांनी सरकारच्या विरोधात घोषणबाजी देत आक्रोश व्यक्त केला. यावेळी संपूर्ण आडत बाजार पेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली.यात शेतकरी ,व्यापारी, मापाड्यांनी सहभाग नोंदवून बंद ला प्रतिसाद दिला. यावेळी महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती तथा लातूर जिल्हा शिवसेना सहसंपर्कप्रमख संतोष सोमवंशी , महिला संघटक जयश्रीताई उटगे, युवासेना जिल्हा प्रमुख दिनेश जावळे, खरेदी विक्री संघाचे उपसभापती शेखर चव्हाण, औसा बाजार समिती मा. उपसभापती किशोर जाधव, लातूर शहरप्रमुख रमेश माळी, रमेश पाटील ,युवासेना उपजिल्हाप्रमुख अभिजित जाधव, युवासेना तालुका प्रमुख महेश सगर, युवासेना विधानसभा प्रमुख विशाल क्षीरसागर, शिवसेना उपतालुका प्रमुख प्रवीण कोव्हाळे, विजय पवार, विलास लंगर, प्रवीण बालगीर ,किशोर भोसले, सिध्देश्वर जाधव, गणेश जाधव, वैभव लंगर, वैभव मोरे,श्रीधर साळुंके, नवनाथ लवटे, महेश लंगर, केशव डांगे, शिवराज पाटील, श्रीहरी उत्के, सूर्यकांत मुसळे, धनंजय सोमवंशी, राहुल मोरे,अजित सोमवंशी, निलेश अजने, बस्वराज बर्दापूरे, दत्ता साळुंके, चंद्रकांत तळेगावे, नेताजी भोईबार, विकास काळे, सुधीर खंडागळे, शाहूराज जाधव, अनंत जगताप, विनायक कांबळे, गोपाळ साठे, मुरलीधर पाटील व आडत व्यापारी, गुमास्ता, हमाल, गाडीवान व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.