2 हजार पोलीस तैनात, सीसीटीव्ही द्वारे ठेवणार लक्ष... बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी लातूर पोलीस सज्ज!*
लातूर (प्रतिनिधी ) गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेला गणेशोत्सवाचा जल्लोष आता अखेरच्या टप्प्यावर आला आहे. गुरूवार (28, सप्टेंबर) ला गणपतीचे विसर्जन होणार आहे. दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी लातूर मधील गणेश मंडळांनी जय्यत तयारी केली असून पोलीस प्रशासनही सज्ज झाले असून एकूण 1284 गणेश विसर्जन होणार आहेत.
*कसा असेल बंदोबस्त...*
गणेश विसर्जन मिरवणुक काळात शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सोनसाखळी चोरी आणि महिलांची छेडछाड रोखण्यासाठी पोलिस पथके, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी पोलिस मदत केंद्र तसेच संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मिरवणूक मार्गांवर 128 सीसीटीव्हींची नजर असणार आहे.
गणेश मूर्तीचे संकलन करण्यासाठी एकूण 35 ठिकाणी निश्चित करण्यात आली असून त्या ठिकाणी गणेश मूर्तीचे संकलन होणार आहे.
लातूर जिल्ह्यामध्ये विसर्जन मिरवणूक काळात
07 पोलीस उपाधीक्षक ,
27 पोलीस निरीक्षक,
72 सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक
958 पोलीस अंमलदार, त्यांच्या मदतीला 985 होमगार्ड ,
राज्य राखीव दलाच्या 2 तुकड्या,
दंगा काबू पथकाचे 4 प्लाटून तसेच शिग्रकृती दलाचे 2 पथक तैनात करण्यात आले आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.