आरोग्य व्यवस्थाप प्रणालीतील दुवा म्हणजे फार्मासिस्ट - माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे

 आरोग्य व्यवस्थाप प्रणालीतील दुवा म्हणजे फार्मासिस्ट - माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे 





औसा (प्रतिनिधी ) आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी आणि विविध रोगांवर उपचार करण्यात डॉक्टरांसोबतच फार्मासिस्टचीही मोठी भूमिका आहे, फार्मासिस्टना 'केमिस्ट' देखील म्हटले जाते. ही अशी व्यक्ती आहे ज्याला औषधांबद्दल पूर्ण माहिती आहे . फार्मासिस्ट  हे  लोकांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर  असतात . आणि फार्मासिस्ट विध्यार्थ्यानी प्रॅक्टिकल शिक्षणाला महत्व द्या,  हि काळाची गरज आहे असे प्रतिपादन लातूर महानगर पालिकेचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, हासेगाव  आणि लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर यांच्या संयुक विद्यमानाने   जागतिक फार्मासिस्ट डे निमित्त मॉडेल आणि पोस्टर सादरीकरण कार्यक्रमात बोलत  होते .



         जागतिक फार्मासिस्ट डे निमित्त मॉडेल आणि पोस्टर सादरीकरण या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे , लातूर येथील एफ .डी .ए. चे सहाय्यक आयुक्त रुद्रमणी पोंगले , लातूर शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य संगप्पा बावगे , उमाकांत जाधव , जयप्रकाश रेड्डी , शिवाजी हांडे, संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे,सचिव वेताळेश्वर बावगे, कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे,   संचालक नंदकिशोर बावगे, मुलगे आत्माराम, प्राचार्या  डॉ. श्यामलीला जेवळे (बावगे)  आणि मुख्याध्यापक कालिदास गोरे , प्राचार्य श्रीनिवास बुमरेला इत्यादी मंचावर उपस्थित होते. 

           या कार्यक्रमाची सुरवात श्रीगणेश आणि सरस्वती प्राथमीचे पूजन करून करण्यात आले , फार्मासिस्ट दिनानिमित्त  श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थे अंतर्गत सायन्स आणि फार्मसी विभागाच्या विध्यार्थ्यांसाठी   लॅब डेकोरेट , मॉडेल स्पर्धा  , पोस्टर सादरीकरण आणि रक्तदान शिबीर इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी डॉ. नागोबा एस .एन. ,डॉ देशपांडे  ए.एन.,शिरसाट एम.के. कोजगी संतोष , गरड एस व्ही इत्यादींना आमंत्रित करण्यात आले होते. 

              

       मॉडेल स्पर्धेमध्ये बी.फार्मसी द्वितीय वर्षातील लातूर महाविद्यालयातून कु. योगिता पाटील या  विध्यार्थीने प्रथम पारितोषिक ५०००/- आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले   . द्वितीय पारितोषिक हासेगाव महाविद्यालयातून बी फार्म तृतीय वर्षातील  शिवकुमार येदले याना ३०००/-रोक रक्कम   आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तर तृतीय पारितोषिक  लातूर सायन्स कॉलेज मधील शेख तस्लिन याना २०००/- रोक रक्कम   आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. 

                 पोस्टर सादरीकरण स्पर्धेत हासेगाव फार्मसी  महाविद्यालयातून  शेख सबा प्रथम ,द्वितीय काळे लक्षिमन आणि ऋतुजा बोकाडे तर तृतीय पाटील वैष्णवी . 

                    पोस्टर सादरीकरण स्पर्धेत लातूर  फार्मसी  महाविद्यालयातून बजरंग बिरादार प्रथम द्वितीय अंजली राऊत आणि स्वाती चौरे आणि तृतीय ओमकार पवार याना प्रत्यकी प्रथम पारितोषिक ३०००/- द्वितीय पारितोषिक २०००/- तर द्वितीय पारितोषिक १०००/- रोक रक्कम   आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्याच बरॊबर ओरल प्रझेंटेशन मध्ये प्रथम येंगे वैष्णवी बालाजी द्वितीय तरके सुमित आणि तृतीय काकडे वैभव याना प्रत्यकी प्रथम पारितोषिक ३०००/- द्वितीय पारितोषिक २०००/- तर द्वितीय पारितोषिक १०००/- रोक रक्कम   आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

                   

         सहाय्यक आयुक्त रुद्रमणी पोंगले यांनी ज्ञान आणि इंग्लिश भाषा या भर देऊन औषध निर्माण शास्त्राची प्रतिमा वाढविण्यासाठी तळमिळीने प्रयत्न करावा असा मोलाचा संदेश दिला . 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आयेशा पटेल यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ नागोबा एस. एन यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या