शेतकऱ्याच्या विविध प्रश्नांसाठी तुळजापूर मोड औसा येथे शिवसेनेचा भव्य रास्ता रोको आंदोलन . लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करुन प्रति हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळाली पाहिजे,शिवसेनेची मागणी

 शेतकऱ्याच्या विविध प्रश्नांसाठी तुळजापूर मोड औसा येथे शिवसेनेचा भव्य रास्ता रोको आंदोलन .

लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करुन प्रति हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळाली पाहिजे,शिवसेनेची मागणी





औसा प्रतिनिधी मुखतार मणियार


भारतीय जनता पार्टीचे केंद्रातील सरकार तसेच महाराष्ट्र राज्याच्या सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अपयश येत असून सतत शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. नैसर्गिक संकटाचा सामना करीत असताना शेतकऱ्यांना जीवन जगणे कठीण झाले असून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने बुधवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता तुळजापूर मोड औसा येथे भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले .या आंदोलनाचे नेतृत्व माजी आ. दिनकरराव माने आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख  शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना २५% आग्रीम पिक विमा त्वरित देण्यात यावा, शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा, लातूर जिल्ह्यासाठी सोयाबीन संशोधन केंद्र सुरू करावे, सन २०२२ चा प्रधानमंत्री पिक विमा योजना शेतकऱ्यांना त्वरीत देण्यात यावा, लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून प्रति हेक्टरी 50 हजार रुपये मदत करावी, मराठा समाजाला सरसगट कुणबी जात प्रमाणपत्र देऊन आरक्षण मिळावे, जनावरांसाठी चारा छावण्या उभारून पाण्याची सोय करावी या विविध मागण्यासाठी उद्धव बाळासाहेब


ठाकरे यांची शिवसेना रस्त्यावर उतरली असून शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी आक्रमक भूमिका घेत  दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.



केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी आयोजित रस्ता रोको आंदोलनामध्ये  उपजिल्हा प्रमुख बजरंग दादा जाधव, पप्पुभाई कुलकर्णी,जयश्रीताई उटगे,संजयराव उजळांबे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे,उप शहर प्रमुख सचिन पवार,तालुक्यातील शेतकरी बांधव तसेच शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या