पंतप्रधान यांच्या सुपोषित भारत "या संकल्पनेतून सन 2018 पासून सप्टेंबर महिना "राष्ट्रीय पोषण महिना" म्हणून साजरा

पंतप्रधान यांच्या  सुपोषित भारत "या संकल्पनेतून सन 2018 पासून सप्टेंबर महिना "राष्ट्रीय पोषण महिना" म्हणून आपण साजरा करतो.


को.पांढरी (शाहिद पटेल )
त्या अनुषंगाने आज दिनांक 6 9 23 रोजी आष्टा कासार विभाग अंतर्गत तालुका लोहारा मौजे कोळनुर पांढरी या गावात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सुपोषित भारत, साक्षर भारत ,सशक्त भारत. या विषयावर विभागाच्या पर्यवेक्षिका मंजुषा कुलकर्णी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
यात 1बाळाला जन्मापासून सहा महिन्यापर्यंत निव्वळ स्तनपान व नंतर पूरक पोषण आहार द्यावा
2 स्वस्त बालक स्पर्धा
3 पोषणाबरोबर शिक्षण
4 मिशन लाईफ अंतर्गत पोषणात सुधारणा
5 मेरी माटी मेरा देश
6 ॲनिमिया तपासणी उपाय व जनजागृती.
या सर्व विषयावर कुलकर्णी मॅडम यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
सदरील कार्यक्रमासाठी सरपंच. गावड़े मैडम
शिक्षिका साखरे मॅडम. गावातील माता व किशोरी यांनी खूप परिश्रम घेतले.
उल्लेखनीय बाब म्हणजे पाककृती गावातील किशोरी मुली आणि महिलांनीच बनवल्या आहेत. त्याचे सादरीकरण त्यांनी स्वतः केले.
याचे सर्व श्रेय अंगणवाडी सेविका मैमुना जब्बार शेख व मदतनीस महादेवी अर्जुन जाधव यांनाच जाते.
विभागातील इतर सेविकांनीही त्यांना मदत केली.
यावेळी पोषणाची शपथ ही सर्व ग्रामस्थांनी घेतली. प्रत्येक पदार्थाचा आस्वाद उपस्थित त्यांनी घेतला तसेच घरीही उंदियो सोया मिल्क शेंगातील बटर हे पदार्थ करण्याविषयी संमती दर्शवली.
आज गोकुळाष्टमी निमित्त राधा व कृष्ण असा साज अंगणवाडीतील बालकांनी केला होता.
छोटा मुलगा जब्बार शेख सही पोषण देश रोशन अशा घोषणा देऊन उपस्थित त्यांची मने त्यांनी जिंकली.
तसेच कोळनूर पांढरी गावातील सर्व माता किशोरी आणि ग्रामस्थ यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या