लातूर क्रीडा संकुल च्या ग्राउंड वर लातूर पोलिसांचे दंगा काबू रंगीत तालीम

*लातूर क्रीडा संकुल च्या ग्राउंड वर लातूर पोलिसांचे दंगा काबू रंगीत तालीम*

लातूर रिपोर्टऱ ब्यूरो 
               आगामी गणेश उत्सव व ईद ए-मिलाद सणाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांचे आदेशान्वये व अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात लातूर क्रीडा संकुलच्या ग्राउंडवर आज रोजी दंगा काबू योजनेची रंगीत तालीम परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक श्रीमती अंकिता कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
              दंगा काबू योजनेत रंगीत तालीममध्ये पोलीस मुख्यालय, दंगा काबू पथक, शीघ्र कृती दल, लातूर शहरातील पाचही पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस अंमलदार असे एकूण 94 पोलीस अंमलदार व 10 पोलीस अधिकारी हजर होते.
              आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने आयोजित दंगा काबू योजनेची रंगीत लातूर क्रीडा संकुल येथे पार पडली. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडल्यास पोलीस अवघ्या काही वेळेतच त्या ठिकाणी दाखल होऊन तेथील परिस्थिती सुरळीतपणे हाताळण्यासंदर्भात पोलिसांची क्षमता तपासण्यात आली. तसेच सदरची परिस्थिती हाताळताना निर्माण प्रश्नाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या