स्नेह, प्रेम और मानवता हिच खरी शिक्षा आहे : फादर सल्डानाशिक्षकांचा सन्मान म्हणजे पूर्ण राष्ट्राचा सन्मान आहे : लॉ.राजेंद्र शहा

स्नेह, प्रेम और मानवता हिच खरी शिक्षा आहे : फादर सल्डाना
शिक्षकांचा सन्मान म्हणजे पूर्ण राष्ट्राचा सन्मान आहे : लॉ.राजेंद्र शहा



सोलापूर- आज जगात स्नेह, प्रेम आणि मानवता हिच खरी शिक्षा देण्याची गरज आजच्या शिक्षकांवर आहे. या शिक्षणामुळे जगात बंधुभाव वाढेल लोकांच्या मनामध्ये जे एकमेकांमध्ये द्वेष आहे दूर होतील व मानवतेमध्ये एकमेकांविरुध्द आदर वाढेल ज्यामुळे राष्ट्रात एकमता टिकू राहील, असे उद्गार फादर सल्डाना यांनी पुरस्कार वितरण कार्यक्रमात शिक्षकांसमोर मांडले.
लायन्स क्लब ऑफ सोलापूर क्लासिकच्यावतीने दरवर्षी शहर व जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळा व महाविद्यालयात कार्यरत असलेल्या शिक्षकांना लायन्स आयडियल टिचर्स ॲवॉर्ड २०२३ ने ऑफीसर क्लबजवळील राज महल येथे शनिवारी झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमात रिजनल चेअरम एमजेएफ ला. राजेंद्र शहा कासवा, उपडिस्ट्रीक्ट गर्व्हनर एमजेएफ ला. ॲड. एम. के. पाटील, आय.पी. डिस्ट्रीक्ट गर्व्हनर एमजेएफ ला. राजशेखर कापसे, जि.प.चे शिक्षणाधिकारी (प्लॉनिंग) सुलभा वटारे, झोन चेअरमन ला. चंद्रकांत यादव, ॲड. विद्या कटकधोंड आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर ला. शब्बीर शेख, ला. आसिफ इक्बाल, पीडीजी एमजेएफ ला. डॉ. एन.के. चंडक, पीडीजी एमजेएफ ला. डॉ. गुलाबचंद्र कासलीवाल, पीडीजी एमजेएफ ला. अशोक मेहता, पीडीजी एमजेएफ ला. अरविंद कोनर्सीगी, पीडीजी एमजेएफ ला. डॉ. गुलाबचंद शहा, पीडीजी एमजेएफ ला. डॉ. प्रा. झपके, पीडीजी एमजेएफ ला. डॉ. व्यंकटेश यजुर्वेदी, पीडीजी एमजेएफ ला. जितेंद्र दोशी आदीजण व्यासपीठावर उपस्थित होते.
लायन्स क्लब इंटरनॅशनलतर्फे शिक्षक दिनानिमित्त उत्कृष्ट शिक्षकांचा लायन्स आयडियल टिचर्स ॲवॉर्ड २०२३ ने सन्मान करण्यात आला. यात पुढील शिक्षकांना हे पुरस्कार मिळाले- रेव्ह. गोडवेन सालधाना, डॉ. स्फुर्ती बिराजदार, रिजवान शेख, अ. रहीम शेख, सौ. अंजुमआरा शेख, संतोष गायकवाड, सौ. तस्लीम पठाण, सौ. महेजबीन सय्यद, सौ. उमादेवी करली, सौ. रूखसाना शेख, सौ. शिला शिंदे, जमीर शतरंजीवाले, सौ. रूखसाना बागवान, सौ. शाहेदा मंगलुर, सौ. शर्मिला परदेशी, राजशेखर नाटीकर, सौ. दीपाली बोराळे, सौ. वैशाली गोंदकर, अब्दुल अजीज शेख, सौ. फिरदोस बडेघर, सौ. नफीसा शेख, मुश्ताक शेख, सौ. बीबी हाजरा पठाण या सर्वांना लायन्स आयडियल टिचर्स ॲवॉर्ड २०२३ ने सन्मानित करण्यात आले तर क्रियेटीव्ह टीचर्स ग्रुप ॲवार्ड म्हणून सौ. रिजवाना प्यारे, सौ. नुरजहाँ बागमरू, सौ. महेजबीन शिलेदार, सौ. शाहीन शेख, सौ. गौसिया होटगी यांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुष्पा मुळके, जस्मीन मुल्ला व फरजाना शेख यांनी केले तर आभार मुख्याध्यापक रिजवान शेख यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या