*अंगणवाडी सेविका आशा दळवे सेवारत्न पुरस्काराने सन्मानित*
औसा : करजगाव तालुका औसा येथील तपसे चिंचोली बीट मधील अंगणवाडी क्र.३ च्या अंगणवाडी सेविका श्रीम.आशा दळवे यांना पूर्व प्राथमिक शिक्षणामध्ये केलेल्या शैक्षणिक कामगिरीसाठी सेव रत्न पुरस्काराने औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार व शोभा पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.
प्रगत शिक्षण संस्था,फलटण पंचायत समिती औसा एकात्मिक बाल विकास सेवा योजना व एच टी पारेख फाउंडेशन यांच्या संयुक्तपणे औसा तालुक्यातील अंगणवाड्यांसोबत सुरू असणाऱ्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षणातील पूल या प्रकल्पांतर्गत श्रीमती आशा दळवे यांनी उत्कृष्ट काम त्यांनी स्वतःच्या अंगणवाडी सोबत इतरही अंगणवाडी सेविका मदतनीस यांना मार्गदर्शन त्यांच्या या कामाबद्दल त्यांना बालविकास प्रकल्प अधिकारी श्री.बालाजी कोरे सर, तुळजापूर चे बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री किशोर गोरे सर, किल्लारी बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम.अनुपमा सुनापे, औसा प्रकल्पाचे शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास कुंभकर्ण सर,पर्यवेक्षिका भोसले, वाहुळे यांचे मार्गदर्शन मिळाले.त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, " प्रगत शिक्षण संस्थे अंतर्गत औसा तालुक्यातचालू सुरू असलेल्या उपक्रमामुळे मुलांची प्रगती होण्यास वाव मिळाला. त्यामुळेच मला उत्कृष्ट कामाबद्दल सेवा रत्न पुरस्कार मिळालेला आहे. प्रगत शिक्षण संस्थेच्या विश्वस्त डॉ.मंजिरी निंबकर यांच्यामुळे हे उपक्रम आमच्यापर्यंत पोहोचले आणि आमची बाल शिक्षणातील समज वाढली व विद्यार्थ्यांची प्रगती झाली.मी त्यांच्या आमचे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे सर्व पदाधिकारी, प्रगत शिक्षण संस्थेच्या समन्वयक प्रकाश अनभुले सर, प्रकल्प सहाय्यक मुक्ता बनसोडे यांची खूप खूप आभारी आहे.
यावेळी मा.अभिमन्यु पवार,भाजप तालुका अध्यक्ष मा.सुभाषराव जाधव साहेब, औसा तालुका विधानसभा निवडणूक प्रमुख, मा.स़तोषअप्पा मुक्ता, सौ.शोभा पवार, सौ पुनम मुक्ता, सौ.अयोध्या जाधव, सरपंच विलास कारे, उपसरपंच ॲड श्रीधर जाधव, माजी सरपंच, उपसरपंच, निलेश आजणे,भाजप महिला आघाडी कार्यकर्ता सौ.सुनीता सुर्यवंशी, सौ.सुकेशना जाधव, सौ चमक जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.