औसा येथील पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात
58 उमेदवारांची प्राथमिक निवड
लातूर, दि. 28 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि औसा येथील एन बी एस इंस्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा महिना निमित्त बुधवारी औसा येथे आयोजित पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रोजगार मेळाव्यात 58 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी अजीम कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य शेख निजामोद्दीन इसाकउद्दीन, आझाद महाविद्यालयाचे प्राचार्य मासुमदार इलाहीपाशा, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बालाजी मरे यांची उपस्थिती होती.
रोजगार मेळाव्यात लातूर, पुणे, मुंबई, येथील 10 आस्थापना, उद्योजक उपस्थित होते. यावेळी उपस्थित 307 उपस्थित उमेदवारांपैकी 175 उमेदवारांनी मुलाखती दिल्या. त्यापैकी 58 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
बेरोजगार युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्यावतीने यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. रोजगार मेळावा यशस्वीतेसाठी एन बी एस इंस्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राचे अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
******
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.