विद्यार्थ्यांमधील नकारात्मक विचार देशासाठी व समाजासाठी घातक
अल-हदीद असोसिएशनच्या वार्षिक अचिव्हर्स डे कार्यक्रमात डॉ. रोशन जहां यांचे प्रतिपादन
सोलापूर- 'विद्यार्थ्यांतील नकारात्मक विचार देशासाठी व समाजासाठी अत्यंत घातक असून यामुळे प्रगतीचे सर्व मार्ग बंद होतात', असे उद्गार सुप्रसिध्द मोटिव्हेशनल स्पीकर डॉ. रोशन जहाँ यांनी काढले.
अल-हदीद असोसिएशन सोलापूरच्या वार्षिक अचिव्हर्स डे निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होत्या. अध्यक्षस्थानी बेगम कमरुन्निसा कारीगर गर्ल्स हायस्कूल व ज्यु. कॉलेजच्या प्राचार्या सबीना इंगळगी होते. बेगम कमरुन्निसा कारीगर गर्ल्स हायस्कूल व ज्यु. कॉलेजच्या परांगणात आयोजित या कार्यक्रमात सुमारे १००० विद्यार्थिनींनी भाग घेतला होत्या. आपल्या भाषणात त्या पुढे म्हणाल्या, 'आई-वडिलांचा आदर करा, शिक्षकांचे उपकार विसरू नका, आत्मविश्वास बाळगा, कोणत्याही आपत्तीला घाबरू नका, कुठल्याही परिस्थितीत ड्रापआऊट होऊ नका, शिक्षण फक्त नोकरीसाठी नाही तर चांगला नागरिक घडविण्यासाठी असतो. कठोर परिश्रम व सकारात्मक विचार घेऊन उद्दिष्ट प्राप्तीसाठी अग्रेसर व्हा. अल्लाह कधीही माणसावर त्याच्या ताकतीच्यावर त्रास देत नाही. त्यांच्यावर विश्वास ठेवा व धीर सोडू नका. शिक्षण पूर्ण करण्यासाठी सर्व सरकारी योजनेचे लाभ घ्या'.
याप्रसंगी दहावी, बारावी, नीट, सीईटी, अभियांत्रिकी व पीएच.डी. परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. नीट परीक्षेत ७२० पैकी ६८५ गुण प्राप्त करणाऱ्या फातिमा सलीम शेखचा विशेष उल्लेख करण्यात आला तर फार्मसीमध्ये पीएच.डी. प्राप्त करणाऱ्या खान नाज़िया इक्बालचाही विशेष गोरव करण्यात आला. सोलापूरचे माजी न्यायाधीश डॉ. शब्बीर औटीचा ही सोलापूर विद्यापीठातून पीएच.डी. प्राप्त केल्याबद्दल विशेष उल्लेख करण्यात आला.
याप्रसंगी जे लोक हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्थसहाय्य्ा केलेल्या सफदर शेख, हारून रशीद मोगल, नजीर मुन्शी, महेबुब चौधरी, एजाज चिनिवार यांच्यासह जीन्स कार्नरचेही आभार व्यक्त करण्यात आले.
प्रारंभी कु. शिफा भंडाले यांच्या कुराण पठणाने व कुतुबोद्दीन शेख यांच्या नातने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावर्षी उत्कृष्ट डिजीटल शाळेचा पुरस्कार जि.प. होटगी शाळेला तर उत्कृष्ट सामाजिक संस्थेचा पुरस्कार तंजीमे हमदर्द-ए-इन्सानियत यांना देण्यात आला. अचिव्हर्स म्हणून १०० वेळा रक्तदान केलेल्या अल-हदीद असोसिएशनचे इसहाक करजगी व कोरोना काळात अत्यंत कष्ट करून अनेकांचे अंत्यविधी करणाऱ्या जहांगीर लादेनचा ही सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात सौ. सबीना इंगळगी यांनी सांगितले की, डॉ. रोशन जहाँ यांचे भाषण विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी असून आम्ही सर्व भावनिक झालो होतो. आपले दोन्ही पाय एक रेल्वे अपघातात गेल्यानंतर सुध्दा धीर नाही सोडणे हे एक अलौकीक उदाहरण आहे व अत्यंत बिकट परिस्थितीत त्यांनी एम.डी. पूर्ण केले हे कौतुकास्पद आहे. आम्ही त्यांचे ऋणी आहोत की त्यांनी आपला बहुमोल्य वेळ आमच्या विद्यार्थिंनींसाठी दिला. त्यांच्या आई साहिबा व पती सलमान मंसूरीचेही आभार मानते. पाहुण्याची ओळख सचिव रहीम काजी यांनी केली. सूत्रसंचालन विकारअहमद शेख व डॉ. अ. रशीद शेख यांनी केले.
याप्रसंगी अल-हदीदचे मुश्ताक हरयाल, महिबुब नदाफ, हमीद शेख, अ. करीम शेख, खलीफा एज्युकेशन ट्रस्टचे नसीर खलीफा, बीक्युकेचे आफरीन लालकोट, रिजवाना रंगरेज, आरिफ पठाण, जमील दखनी, अशफाक मनियार व अनेक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.