सोयाबीन संशोधन केंद्र लातूर येथे व्हावे - संतोष सोमवंशी*

*सोयाबीन संशोधन केंद्र लातूर येथे व्हावे - संतोष सोमवंशी*




लातूर: लातूर जिल्हा गेल्या दीड दशकापासून हा सोयाबीन हब म्हणून ओळखला जातो लातूर जिल्हा सोयाबीन उत्पादन करणारा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. इतर जिल्ह्याच्या मानाने सोयाबीन पिकाला लागणारे हवामान लातूर जिल्ह्यात अतिशय पोषक वातावरण असल्याने दरवर्षी जवळपास सहा लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली जाते. सोयाबीन पिकासाठी साधारण सातशे मिलिमीटर पाऊस आवश्यक असतो, त्या तुलनेत जिल्ह्यात साडे सातशे ते आठशे मिलिमीटर पाऊस सरासरी पडतो. त्यामुळे लातूर येथे सोयाबीन पिकावर प्रक्रिया उद्योग करणारे लहान मोठे उद्योग असल्यामुळे येथील सर्व व्यवहार हे सोयाबीन पिकावर अवलंबून आहेत. यापूर्वीच्या सरकारमधील कृषिमंत्री यांनी हे संशोधन केंद्र लातूर येथे व्हावे अशी अपेक्षा सोयाबीन परिषद मध्ये व्यक्त केली होती परंतु सध्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोयाबीन संशोधन केंद्र हे परळी येथे हलवल्याने लातूरकरांना फार मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे सरकारने या घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा व सोयाबीन संशोधन केंद्र लातूर येथे करावे, अशी मागणी लातूर शिवसेना सहसंपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ उपसभापती संतोष सोमवंशी यांनी केली आहे.
  हे केंद्र लातूर येथे होण्यासाठी जनआंदोलन उभे करून सरकारला लातूर येथे केंद्र करण्यासाठी भाग पाडणार असे मत संतोष सोमवंशी यांनी व्यक्त केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या