लाठी या खेळास शालेय क्रीडा स्पर्धेचा दर्जा द्यावा- संतोष सोमवंशी*

*लाठी या खेळास शालेय क्रीडा स्पर्धेचा दर्जा द्यावा- संतोष सोमवंशी




तुळजापूर:- पारंपरिक लाठी या खेळास शालेय क्रीडा स्पर्धेत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार असे मत महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे उपसभापती तथा लातूर शिवसेना सह संपर्कप्रमुख संतोष सोमवंशी यांनी व्यक्त केले. 
    धाराशिव जिल्हा तेंग सुडो कराटे असोसिएशन आयोजित तुळजापूर येथे दहावी राज्यस्तरीय तेंग सुडो (कोरियन कराटे) अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण होते. या स्पर्धेत महाराष्ट्रातील 27 जिल्ह्यातील 650 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला प्रथम क्रमांक सातारा जिल्हा, द्वितीय जिल्हा धुळे तृतीय धाराशिव चौथे ठाणे जिल्हयाचा क्रमांक घेऊन विद्यार्थ्यांनी यश मिळवले. या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती तथा सहसंपर्कप्रमुख संतोषभाऊ सोमवंशी, धाराशिव सहसंपर्कप्रमुख नंदूभैया निंबाळकर, स्पर्धेच्या मुख्य आयोजक शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई पवार, तेंग सुडो स्पोर्ट्स चे राज्य अध्यक्ष मास्टर रॉकी डिसूझा, सचिव सुभाष मोहिते, धाराशिव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, श्याम भाऊ पवार, लातूर युवा सेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे, औसा खरेदी विक्री संघ उपसभापती शेखर चव्हाण, युवासेना तुळजापूर तालुकाप्रमुख प्रतिक रोचकरी, बाळासाहेब शिंदे, आदीसह मोठ्या संख्येने क्रीडा विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या