सोयाबीन संशोधन केंद्रासाठी उद्या लातूर बाजार समिती सर्व व्यवहार बंद ठेवा :संतोष सोमवंशी

सोयाबीन संशोधन केंद्रासाठी उद्या लातूर बाजार समिती सर्व व्यवहार बंद ठेवा :संतोष सोमवंशी



 
लातूर (प्रतिनिधी )की दिनांक 16 सप्टेंबर रोजी संभाजीनगर येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोयाबीन संशोधन केंद्र परळी येथे स्थापन करायचा निर्णय शासनाने घेतला आहे.
लातूर जिल्हा हे सोयाबीन हब महणून ओळखला जातो. येथे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते त्यामूळे बरेच लहान मोठे सोयाबीन वर प्रक्रिया करणारे उद्योग लातूर येथे आहेत त्यामूळे सोयाबीन संशोधन केंद्र लातूर येथे व्हावे यासाठी सरकारने पुनर्विचार करावा या मागणीसाठी दिनांक 21/9/2023 वार शुक्रवार रोजी लातूर बाजार समितिचे सर्व व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त करावा अशी मागणी 
संतोष ज्ञानोबा सोमवंशी उपसभापती महाराष्ट्र राज्य बाजार समिती, सहकारी संघ, पुणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, लातूर जिल्हा सहसंपर्कप्रमुख यांनी सभापती व सचिव कृषि उत्पन्न बाजार समिती कडे केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या