साहेब जल साक्षरता रॅली ला बाळ देण्यापेक्षा लातूरला कायमस्वरूपी पाणी द्या- ( विनोद कोल्हे मराठवाडा अध्यक्ष भिम आर्मी
लातुर प्रतिनिधी:-
लातूर जिल्ह्यात दर वर्षी सरासरी पेक्षा पाऊस हा कमी पडतो, कमी पाऊस पडत असल्याने जिल्ह्यात सतत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असतो त्याच बरोबर MIDC ला हि पाणी कमी पडत असल्याने येथील कारखाने बंद पडत आहेत त्यामुळे लातूर शहरांत बेरोजगारीचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र पाहण्यात येत आहे
लातूरला कायम स्वरूपी हक्काचे पाणी मिळावे म्हणून लातूर करांकडून सतत आंदोलने होत असतात पण
त्यातच निलंगा मतदार संघांचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या वतीने जिल्ह्यात जल साक्षरता रॅली काढण्यात आली आहे हि रॅली प्रत्येक तालुक्यातून जात आहे
आज दि.24 सप्टेंबर2023 रोजी दैनिक पुण्य नगरी ला बातमी आहे आमदार निलंगेकर यांच्या जल साक्षरतेला उपमुख्यमंत्री फडणवसांचेही बळ
फडणवीस साहेब केंद्रात आणि राज्यात तुमचीच सत्ता आहे लातूरच्या पाणी प्रश्ना बाबत आपल्याला चांगलीच माहिती आहे आज आमदार संभाजी पाटील यांनी काढलेल्या जल साक्षरता रॅली ला आपण बळ दिलात हि बातमी आम्ही लातूरकरांनी वाचली पण साहेब जल साक्षरता रॅली ला बळ देण्यापेक्षा लातूरला कायम स्वरूपी पाणी द्या असे विनोद कोल्हे भिम आर्मी, मराठवाडा अध्यक्ष हे म्हणाले
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.