संसदेत अशोभनीय वर्तन करणाऱ्या रमेश विधुडी यांचे सदस्यत्व रद्द करुन त्यांच्यावर कार्यवाही करावी-सय्यद मुजफ्फर अली इनामदार
औसा प्रतिनिधी
भाजपा सांसद रमेश विधुडी यांनी लोकसभेच्या पवित्र दालनात अल्पसंख्यांक मुस्लीम समाजाचे खासदार कुंवर दानिश अली याबद्दल अपमानजनक वक्तव्य करत शिवीगाळ केली तसेच आतंकवादी म्हणत संपूर्ण समाजाचे अपमान केल्याबदल त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी एम आय एम औसाच्या वतीने औसा तहसीलदार मार्फत सन्माननीय राष्ट्रपती यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.त्याचे सविस्तर वृत्त असे
दक्षिण दिल्लीचे भाजपाचे खासदार रमेश विधूडी यांनी लोकसभेत चंद्रयान 3 च्या यशस्वी कामावर बोलणाऱ्या बसपाचे खासदार कुंवर दानिश अली यांच्या वक्तव्यावर बोलताना विवादीत भाष्य केले. रमेश विधूडी यांनी लोकसभेचे पवित्र्य तर मलिन केलेच यासह एका अल्पसंख्याक मुस्लीम समाजाच्या खासदारांना अरेराव्या भाषेत शिवीगाळ केली. "मुल्ला" अतंकवादी आहेत असे म्हणत समाजाचा अपमान केला. एवढेच नव्हे तर खासदाराला संसदेत जीवे मारण्याची धमकी ही देण्यात आली. म्हणजेच देशात लोकशाही असतानाही खासदार सारख्या लोकप्रतिनिधीस आपले मत व्यक्त करण्यास भाजपा सारखे जातीवादी पक्षाचे खासदार अडवत असून त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जाते. तसेच लोकसभेत व तसेच प्रत्येक राज्यातील विधानसभेमध्ये मुस्लीम अल्पसंख्यांक समाजाच्या प्रतिनिधीला दाबण्याचा प्रयत्न केला जातो तसेच मुस्लीम समाजावर आजपर्यंत हल्लेकरण्यात येत होते पण आता ज्या ठिकाणी संविधानीक कायदे बनविले जातात अशा पवित्र ठिकाणी मुस्लीम अल्पसंख्यांक प्रतिनिधी सुरक्षीत नाही. हा प्रकार निंदनिय असून याचा आम्ही जाहीर निषेध करतो. यासह संसदेत असा अशोभनिय "वर्तन करणाऱ्या रमेश बिधुडी यांचे सदस्यत्त्व 6 वर्षासाठी रद्द करुन त्यांच्यावर कार्यवाही करावी अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने दि. 02 ऑक्टोबर रोजी आंदोलन करणार आहोत.या मागणीसाठी एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी औसा तहसीलदार मार्फत सन्माननीय राष्ट्रपती यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.यावेळी निवेदनावर एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार, शेख सिराज, हारुणखा पठाण,अजहर कुरेशी, शेख नय्युम, इस्माईल बागवान, शेख अलीम, शेख मुशीर यांच्या सह्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.