रांजणी तलाठ्याला दोन दिवसात खुलासा सादर करण्याचे तहसिलदारांचे निर्देश!!*

*रांजणी तलाठ्याला दोन दिवसात खुलासा सादर करण्याचे तहसिलदारांचे निर्देश!!*




---------------------------------------------- *लातूर रिपोर्टऱ /बिलाल कुरैशी /कळंब*------------------------- 
कळंब तालुक्यातील रांजणी येथील तलाठी नवले यांच्या कामकाजाबद्दल शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीचा खुलासा दोन दिवसात सादर करण्याचे निर्देश तहसीलदार मुस्तफा खोंदे यांनी तलाठ्याला दि.०१ सप्टेंबर रोजी दिले आहे. तसेच निर्गमित वेळेत खुलासा सादर न केल्यास प्रशासकीय कार्यवाहीसाठी अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात येईल, असेही नोटीस मध्ये म्हटले आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की,कळंब तालुक्यातील रांजणी येथील तलाठी नवले यांच्या कामकाजावर नाराजीचा सूर दाखवत शेतकऱ्यांनी कळंब तहसिलदारांना निवेदनाद्वारे तक्रारी अर्ज दाखल केला होता. त्या तक्रारी अर्जाची दखल घेऊन तहसीलदार खोंदे यांनी तलाठ्याला दोन दिवसात खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या तक्रारीत रांजणी येथील तलाठी शेतकऱ्यांच्या कामकाजासाठी पैशाची मागणी करत असून, सदरील तलाठ्याची तात्काळ चौकशी करून कारवाई करण्यात यावी. अशी मागणी रांजणीतील शेतकऱ्यांनी दि.२२ ऑगस्ट रोजी कळंब तहसिलदारांना निवेदनाद्वारे केली होती. शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन कळंब तहसीलदार मुस्ताफा खोंदे यांनी सदरील तलाठ्याला खुलासा करण्याची नोटीस दि. ०१ सप्टेंबर रोजी दिली आहे. यामध्ये रांजणी येथील तलाठी हे सतत गैरहजर असतात, तसेच त्यांनी कामकाज करण्यासाठी खाजगी दलाल नेमला आहे. हाच दलाल शेतकऱ्यांकडून सातबारा व अन्य कागदपत्र देण्यासाठी शासनाने निर्गमित केलेल्या दरापेक्षा अधिक पैसे घेऊन शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहे. तसेच फेरफार मंजूर करण्यासाठीही पैशाची मागणी करतात. शासनाच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी टाळाटाळ करतात. त्यामुळे सदरील तलाठ्याची खात्यांतर्गत चौकशी करून योग्य ती कारवाई करुन शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा असे निवेदनात म्हटले होते. 
या निवेदनावर सलमान खान पठाण, खाजा शेख, नरसिंग पानढवळे, मुस्तफा शेख, तालिसाब शेख, ताजिम पठाण, एहमद सय्यद, सिद्दीक शेख, हनुमंत सौदागर, पठाण मियाखान, पठाण शेरखान, शेख रशीद, पठाण रसुलखा, बाबु शेख, पवार दगडू, शेख मनसप, फरयाज शेख, तांबोळी महम्मद, साहेबराव गायकवाड, राजू सय्यद, बिरुदेव सुरवसे, अलिम शेख, शामराव सौदागर, हिदायतुल्ला पठाण, सज्जाद शेख, संजय रामा पवार, आमरूषी सौदागर, लिंबराज सौदागर, आय्युब शे ख, रशीद शेख, फरयाज पठाण, कोंदनबी शेख, एजाज पठाण यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या सह्या होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या