अहमदपुर तालुक्यातील किनगाव येथे ग्रामीण रुग्नालय मंजूर करावे या मागणीकरीता अनेक दिवसांनी ग्रामस्थ प्रयत्न करीत असून शासनस्तरावर याची दखल घेतली जात नाही या मागणी बाबत किनगाव विकास कृती समितीने आमरण उपोषनाचा इशारा दिला होता परंतू यावर शासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही शेवटी किनगावकरांना ग्रामीण रुग्नालया करीता अमारण उपोषनास बसावे लागणार आहे.
अगोदरच मराठा आरक्षणाचा मुद्दावर राज्यात वातारण तापले असतांना अहमदपूर तहसिलसमोर किनगाव विकास कृती समितीच्या वतीने ग्रामीण रुग्नालय मंजूर करावे या मागणी करीता अमरण उपोषण करणार असून या उपोषणामुळे शासनाचे लक्ष वेदले जाईल की नाही या कडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
किनगाव येथे अनेक वर्षानी प्राथमिक आरोग्य केंद्र अस्तित्वात असून रुग्नांना सेवा सुविधा अपूर्या पडत आहेत किनगाव हे गाव तिन जिल्हयाच्या सिमेवर असल्यामुळे नागरिकांची येथे मोठ्या प्रमाणात रेलचेल आहे या गावला लागून दोन महामार्ग गेले आहेत आचाणक अपघात झाला तर रुग्नास तात्काळ उपचार मिळत नाही त्यात रुग्न दगावत आहेत कारण शासकिय रुग्नालय २० ते ४० कि.मि अंतरावर आहेत योग्य वेळी योग्य उपचार रूग्नास उपलब्ध झाले तर रुग्न दगावण्याचे प्रमाण कमी होणार आहे.
आशा संवेदनशिल मागणीकरीत किनगाव विकास कृती समितीच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येत आहे.या उपोषणास बसणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी लातूर, तहसिलदार अहमदपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी लातूर, उपसंचालक आरोग्य विभाग लातूर, जिल्हा आरोग्य अधिकारी लातूर, तालुका आरोग्य अधिकारी अहमदपूर यांना देण्यात आले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.