मनपाच्या आवाहनास लातूरकरांचा भरभरून प्रतिसाद २१ हजार गणेशमूर्तींचे संकलन, गत वर्षी पेक्षा जास्त मुर्ती संकलीत


मनपाच्या आवाहनास लातूरकरांचा भरभरून प्रतिसाद २१ हजार गणेशमूर्तींचे संकलन

गत वर्षी पेक्षा जास्त  मुर्ती संकलीत










लातूर/प्रतिनिधी:शहरातील नागरिकांनी घरोघरी स्थापन केलेल्या गणेशमूर्तींचे विसर्जन न करता या मूर्ती मनपाने उभारलेल्या संकलन केंद्रात दिल्या.या माध्यमातून गुरुवारी गणेश विसर्जनाच्या दिवशी २१ हजार ४९१ मूर्तींचे संकलन करण्यात आले.प्रदूषण मुक्तीसाठी नागरिकांनी केलेल्या या सहकार्याबद्दल पालिकेच्या वतीने नागरिकांचे आभार मानण्यात आले. गत वर्षी १४ हजार ६० मुर्ती संकलीत झाल्या होत्या.या वर्षी त्यापेक्षा जास्त मुर्ती संकलीत झाल्या आहेत.

    पालिकेने घरगुती गणेश मूर्तींचे संकलन करण्यासाठी एकूण १५ ठिकाणी केंद्र उभारली होती. याशिवाय सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने बसवण्यात आलेल्या मोठ्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी बारा नंबर पाटी येथील खदानीत व्यवस्था केली होती.मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी तेथे आपापल्या मूर्तींचे विसर्जन केले.अनेक संकलन केंद्रावरही कार्यकर्त्यांनी सार्वजनिक मंडळांनी स्थापन केलेल्या मूर्ती मनपा कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द केल्या.

      बांधकाम भवन येथील मूर्ती संकलन केंद्रात घरगुती स्थापन केलेल्या ६६१५मूर्तींचे संकलन करण्यात आले.सिद्धेश्वर मंदिर येथे २४०५ घरगुती स्थापित गणेश मूर्ती संकलित झाल्या. सरस्वती कॉलनी येथील पाण्याच्या टाकीजवळील संकलन केंद्रात एकूण ८९८ गणेश मूर्तींचे संकलन झाले.दयानंद महाविद्यालय परिसरातील संकलन केंद्रात ४६४ घरगुती मूर्तींचे संकलन झाले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाण्याच्या टाकीजवळील केंद्रात १६७५ घरगुती कर्मचाऱ्यांकडे प्रदान करण्यात आल्या. शासकीय कॉलनी परिसरात ४६६ गणेश मूर्ती जमा झाल्या.तिवारी विहीर येथे १२४९घरगुती मूर्तींचे संकलन झाले.खंदाडे नगर येथे एकूण ५२१९ घरगुती मूर्ती जमा झाल्या.साळेगल्लीत यशवंत शाळा परिसरातील केंद्रात २३८ घरगुती मूर्ती जमा करण्यात आल्या. मंठाळे नगरातील मनपा शाळा येथे एकूण २८६,टाऊन हॉल येथे ८६१ तर विवेकानंद चौकात एकूण २२८ गणेश मूर्तींचे संकलन झाले. नांदेड रस्त्यावर यशवंत शाळा ८७   गणेश मंदिर परिसर ३२४ काशी विश्वेश्वर मंदिर ग्रीन बेल्ट ४७६ असे शहरात एकुण २१४९१ मूर्तींचे संकलन झाले.तसेच शहरातील ३८७ सार्वजनिक मंडळांनी मूर्तींचे संकलन केंद्रात मुर्ती जमा केल्या.

    मनपाने उभारलेल्या संकलन केंद्रांना अतिरिक्त आयुक्त शिवाजी गवळी, उपायुक्त मयुरा शिंदेकर,सहाय्यक आयुक्त मंजुषा गुरमे  यांनी भेटी देऊन पाहणी केली.याकामी महानगरपालिकेचे ३७८ अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती.

    मनपाने केलेल्या आवाहनाला शहरातील नागरिकांनी प्रतिसाद देत हजारो मूर्ती संकलन केंद्रात जमा केल्या. याबद्दल पालिकेच्या वतीने शहरातील नागरिक आणि सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले आहेत.

--




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या