ईद -ए-मिलादुन्नबी निमित्ताने व एम आय एमच्या वतीने
ग्रामीण रुग्णालय औसा येथे
फळ वाटप
औसा प्रतिनिधी
जगाला मानवतेचा, समतेचा व शांतीचा संदेश देणारे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या इद -ए-मिलादुन्नबी हा सण असून या सणाच्या निमित्ताने औसा येथील ग्रामीण रुग्णालयात एम आय एम औसा तर्फे रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.त्या अनुषंगाने 29 संप्टेंबर शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता एम आय एम प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी ग्रामीण रुग्णालय औसा येथे रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम औसा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सुनीता पाटील, डॉ.मुजाहेद शरीफ,व त्यांचे अधिकारी व कर्मचारी व तसेच औसा येथील रामभाऊ शिंदे, बस्वराज कोपरे या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णांना फळ वाटप करुन जंयती साजरी करण्यात आली.व त्या नंतर एम आय एम तर्फे वैद्यकीय अधीक्षक सुनीता पाटील, व डॉ मुजाहेद शरीफ व त्यांच्या टिमचा सत्कार एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी फळ वाटप करताना एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार, शेख मुसीर, शेख अलीम, माजीद पटवेकर, अजहर कुरेशी, इरफान बागवान, मोईन बागवान, हारुणखा पठाण आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.