औसात सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरू... .. केंद्रीय मंत्री नारायण राणे व शिवसेना नेते रामदास कदमांना प्रतिकात्मक श्रद्धांजली..

 औसात सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरू...

..

केंद्रीय मंत्री नारायण राणे व शिवसेना नेते रामदास कदमांना प्रतिकात्मक श्रद्धांजली..

...







औसा:मराठा समाजाला ओबीसी मधून कुणबी म्हणून आरक्षण मिळावे म्हणून औसा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने येथील तहसील कार्यालया समोर बेमुदत साखळी उपोषण सुरू झाले मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आमरण उपोषण ला जाहीर पाठिबा म्हणून हे साखळी उपोषण गुरुवार दि.२६ पासून सुरू करण्यात आले मराठा समाजाचे जेस्ट नागरिक नामदेव नलगे, उत्तम गुलबिले, अजित मुसांडे, प्रदीप मोरे, सचिन गुलबिले, गोपाळ धानुरे, नरसिंग जाधव, गुंडांनाथ सूर्यवंशी, विश्वास औटी, वैजनाथ सुर्यवंशी,पहिल्या दिवशी उपोषणास बसले होते यावेळी शेकडो मराठा समाज बांधवांनी उपोषण स्थळी येऊन पाठिबा दिला...

गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यात तमाम मराठा समाजाच्या वतीने लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले अनेक लक्षवेधी आंदोलने करून सरकारने कुठलीच दखल घेतली नाही 42 दिवसापासून समस्त मराठा समाज उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या शांततेत सुरू असलेल्या उपोषण व सभा याला लाखोंच्या संख्येने उभा आहे 30 दिवसात आरक्षण देऊ असे आश्वासन सरकारने दिले 42 दिवस उलटले तरी अद्याप आरक्षण जाहीर केले नाही बुधवार पासून पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे त्याला पाठींबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने औसात साखळी उपोषण सुरू आहे ...

यावेळी मराठा आरक्षणाचा बाबत बेताल वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे व शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचा निषेध व्यक्त करीत त्यांचा प्रतिमेला प्रतिकात्मक श्रद्धांजली देण्यात आली व दोघांचा जाहीर निषेध करण्यात आला या उपोषणास पाठिबा मोठा मिळत आहे....

..



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या