पोलीस ठाणे गांधी चौक हद्दीत अवैध जुगारावर छापेमारी, 11 व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल. 2 लाख 75 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम यांची रात्रगस्त दरम्यान कारवाई*
लातूर (प्रतिनिधी ) या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या.
उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम जिल्ह्याच्या रात्र गस्तीवर असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर लातूर शहरातील अवैध जूगारावर कारवाई करण्यात आली आहे.
दिनांक 24/10/2023 रोजी काही इसम पैशावर तिर्रट जुगार खेळत आहेत अशी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर यांनी लातूर शहरातील कोल्हे नगर येथील अर्जित देशमुख यांच्या राहते घरी छापेमारी करून बेकायेशीररित्या जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आल्याने एकूण 11 इसमावर कार्यवाही करत त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण 2 लाख 75 हजार 920 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस ठाणे गांधी चौक मध्ये खालील नमूद इसमाविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 चा कलम 4, 5 कायद्यान्वये प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1) ज्ञानेश्वर दत्तात्रेय मोरे वय 22 वर्ष रा. श्रीकृष्ण नगर लातुर.
2) अविनाश लालासाहेब काळे वय 23 वर्ष रा. राजु नसार लातुर.
3) सुमित लक्ष्मण कांबळे वय 19 वर्ष रा. कोल्हे नगर लातुर.
4) दिपक मंगलसिंग खिच्चे,25 वर्ष वीर हनुमंतवाडी लातुर.
5) बिलाल एजाज शेख, वय 31 वर्ष रा.कातपुर रोड लातूर.
6) सचिन संजय गायकवाड 30 वर्ष आर टी ओ कार्यालया जवळ पाचपिर नगर लातुर.
7) मनोज रमेश कांबळे वय 29 वर्ष (रा. सिध्देश्वर चौक लातुर.
8) बलदेव रामलिंग बावरी वय 35 वर्ष रा. विरहनमंतवाडी लातूर.
9) अब्दुलरहीम महबु बागवान वय 30 वर्ष रा. बरकत नगर लातुर.
10) बबन कदम.
11) अर्जित देशमुख.
असे असून आरोपी क्रमांक 10 व 11 बबन कदम व अर्जित देशमुख यांनी त्याच्या घरात जुगार घेण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे आणि हे दोघे मिळून जुगार चालवीत होते.
पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांच्या आदेशावरून जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर धाडी मारुन कार्यवाही करण्याचे सत्र सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून दिनांक 24/10/2023 रोजी पोलीस ठाणे गांधी चौक येथील कारवाईत पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी चाकूर सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम यांचे नेतृत्वातील पथकामधील पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी सदरची कामगिरी केली आहे. पुढील तपास गांधी चौक पोलिस करीत आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.