औसात आजपासून तालुका सकल मराठा समाज बांधवांचे साखळी उपोषण...!
..
मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांना पाठिंबा म्हणून साखळी उपोषण...
...
औसा:मराठा समाजास ओबीसी मधून कुणबी म्हणून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे बुधवार दि.25 पासून अंतरवली सराटी गावात शांततेत आमरण उपोषण करीत आहेत मात्र याकडे शासन स्तरावर कुठलीच दखल घेतली नाही म्हणून श्री जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून औसा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने दि 26 वार गुरुवार सकाळी दहा वाजल्या पासून बेमुदत साखळी उपोषण येथील तहसील कार्यालया समोर करण्यात येणार आहे..
41 दिवसापासून श्री मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण मिळावे यासाठी लढा देत आहेत या पूर्वीही त्यांनी उपोषण केले होते मात्र खुद्द मुख्यमंत्री व सरकार यांनी तीस दिवसात आरक्षण देऊ असे जाहीर केले मात्र आज 41 दिवस उलटले मात्र अद्याप आरक्षण मिळाले नाही आता सकल मराठा समाज पेटून उठला आहे राज्यात सर्वत्र शांततेत विविध मार्गाने आंदोलने, उपोषण होणार आहेत तसेच राजकीय पुढारी यांना गाव बंदी करण्यात येत आहेत आता औसा तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण करून सरकारचे लक्ष वेधले जाणार असून तालुक्यातील सर्व मराठा समाज बांधवांनी आयोजित साखळी उपोषणास आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन औसा तालुका समस्त सकल मराठा समाज व प्रदीप मोरे, गोपाळ धानुरे, शाम भोसले, नागेश मुगळे,गणेश गायकवाड, सदाशिव जोगदंड, विकास हत्तरगे,वैजनाथ
सूर्यवंशी, बाबा थोरात, बालाजी जाधव यांनी केले आहे....
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.