महात्मा गांधीचे विचार देशाला तारतील : माजी आमदार अॅड. अब्राहनी* *सोशल महाविद्यालयास तीस संगणक देण्याचे जाहिर*

 *महात्मा गांधीचे विचार देशाला तारतील : माजी आमदार अॅड. अब्राहनी*

*सोशल महाविद्यालयास तीस संगणक देण्याचे जाहिर*







सोलापूर - एस एस ए आर्टस अॅण्ड कॉमर्स महाविद्यालयात प्राचार्य डॉ .इ जा . तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली व मुंबईचे माजी आमदार एड . युसूफ अब्राहानी, निवृत एसीपी इकबाल शेख, उर्दू चे ज्येष्ठ बाल साहित्यिक फारुक सय्यद, इस्लाम जिमखानाचे ट्रस्टी मो. अली शेख, फेरोज व्होरा, मीर निसार, ॲड. मोहनीन शेख , ज्येष्ठ सहित्यिक अय्यूब नल्लामंदू, मुख्यध्यापक आसीफ इकबाल यांच्या प्रमुख उपस्थित महात्मा गांधी  व लाल बहादु शास्त्री  जयंती व मुसा शेख संपादित "पैगंबरांचे संस्कार" या मराठी पुस्तीकेचा प्रकाशन समारंभ संपन्न झाला.

प्रमुख पाहुणे ॲड. युसूफ अब्राहानी यांनी मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, महात्मा गांधी व लाल बहादुर  शास्त्री यांचे जीवनातील आर्दशमय किस्से आज ज्येष्ठ  नेत्यांना स्वतः चा स्वार्थापोटी उलट - सुलट बोलले जात असले तरी महात्मा गांधीचेच विचार देशाला तारतील. या दोन्ही नेत्यांचे विचार आज ही सर्वासाठी प्रेरणादायी आहेत, असे मत व्यक्त केले व सोशल महाविघालयास तीस संगणक भेट म्हणून देण्याचे जाहिर करताच टाळ्यांच्या कडकडात त्याचे स्वागत करण्यात आले.

यावेळी उर्दू विभाग प्रमुख डॉ. शफी चोबदार, क्रिडा विभागप्रमुख डॉ. मुश्ताक शेखनीं आपल्या विभागाचे आवाहल सादर केले तर प्र. प्राचार्य डॉ . इ. जा. ताबोळीनीं सर्वांचे शाल बुके देऊन सत्कार केले. सुत्रसंचलन डॉ. गौस शेखने केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. सौ . तस्नीम वड्डोनी करून दिले तर आभार डॉ. नारायणकर यानी मानले.

यावेळी डॉ गढवाल , डॉ . राजगुरु , डॉ . जे एन पटेल, डॉ . आस्मां खान, डॉ . जैनोहीन मुल्लां इ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या