माझ लातूर च्या साखळी उपोषणास शिवसेना ठाकरे पक्षाचा पाठिंबा
लातूर :लातूर येथे मंजूर असलेले जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न त्वरित सोडविण्यात यावा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगी करण रद्द करण्यात यावे सोयाबीन संशोधन केंद्र लातूरलाच स्थापन करण्यात यावे देवणी गो संवर्धन केंद्र देवणी येथे व्हावे या मागणी माझ लातूर च्या साखळी उपोषणास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जाहीर पाठिंबा दिला आहे
यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्कप्रमुख संतोष सोमवंशी यांनी शिवसेनेने सोयाबीन संशोधन केंद्र लातूर येथे करावे या मागणीसाठी लातूर जिल्हातील सर्व बाजार समिती बंद करून निषेध नोंदविला होता तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा लातूर जिल्हात कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा दिला होता हिच मागणी माझ लातूर परिवार करत आहे त्यांना पुर्ण पाठिंबा आहे असे मत व्यक्त केले व शासनाचा जाहीर निषेध केला या मागणीसाठी आंदोलन करावे लागत आहे ही शरमेची बाब आहे व सत्ताधारी आमदाराच्या कामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे अस मत शिवसेना सहसंपर्कप्रमुख संतोष भाऊ सोमवंशी यांनी व्यक्त केले
यावेळी माजी जिल्हाप्रमुख नामदेव मामा चाळक, ञ्यंबक स्वामी, माजी उपसभापती किशोर जाधव, अंनत जगताप, सुरेश मुसळे, सोमनाथ स्वामी आदी सह इतर पदाधिकारी उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.