*महात्मा गांधी विचार मंच तर्फे माझे सत्याचे प्रयोग आत्मचरित्र भेट देऊन जयंती साजरी*
औसा प्रतिनिधी -
औसा शहरातील महात्मा गांधी विचार मंच च्या कार्यकर्त्यामार्फत मागील 25 वर्षापासून विविध उपक्रमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी केली जाते. यावर्षी औसा येथील गांधी चौकामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन सेवानिवृत्त तहसीलदार एल. टी. चव्हाण यांच्या हस्ते आणि व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेशप्पा ठेसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले.
यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराचा जागर व्हावा म्हणून महात्मा गांधी यांनी लिहिलेले आत्मचरित्र माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकांचे वितरण श्री मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवलिंगप्पा औटी यांच्या सौजन्याने उपस्थिना त्यांना करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी महात्मा गांधी विचार मंचचे समन्वयक सुनील भीमाशंकरप्पा उटगे, सुरेश स्वामी, युनुस चौधरी, पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगरे ,सुभाष स्वामी संपादक रोहित हंचाटे, पत्रकार रमेश दूरूगकर, विजय बोरफळे, आसिफ पटेल, एस ए काझी, किशोर जाधव, सुभाष स्वामी, वीरभद्र सिंदुरे, नासेर पटेल, बालाजी शिंदे, अशोक देशमाने ,बालाजी नाईकवाडे, औसा बाजार समितीचे संचालक सुरेश औटी, वीरभद्र कोपरे, जयसिंग चव्हाण, नंदकुमार देशपांडे, दिलावर तत्तापूरे , शिवराज राजुरे, मुख्याध्यापक शिवकुमार मुर्गे, सोसायटीचे व्हा.चेअरमन सनाउल्ला शेख, प्रा युवराज हालकुडे, संभाजी शिंदे, नागनाथ कलमे,रामहरी माळी, यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विचार मंचचे राम कांबळे यांनी केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.