राहत डेंटल केयर क्लिनिक चा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न

 राहत डेंटल केयर क्लिनिक चा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न












औसा(प्रतिनिधी) राहत डेंटल केयर दंत चिकित्सा या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेचा उदघाटन सोहळा रविवार,दिनांक 01 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 12.30 वाजता पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प.सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर व औसा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख,डॉ.एम.बी.पटणे,मौलाना इसराईलसाब,मुफ्ती याकूबसाब,शकील शेख,प्रा.भीमाशंकर राचट्टे,संतोष मुक्ता,सुभाष जाधव,शिवकुमार नागराळे उपस्थित होते.

          यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार शेख परिवाराच्या वतीने करण्यात आला.प्रस्ताविकात डॉ.शेख आर.आर.यांनी नवीन हॉस्पिटल विषयी माहिती सांगताना म्हणाले की,तालुक्यातील रूग्णांना चांगल्या प्रकारची अत्याधुनिक सेवा बाहेर न जाता व कमी खर्चात औसा येथेच मिळावी या उद्देशाने हे नवीन डेंटल केअर हॉस्पिटल उभारले आहे.यासाठी असणारे अत्याधुनिक असे डेंटल सिटी स्कॅन,डिजिटल स्कॅनर,अत्याधुनिक रूट कॅनॉल दंत रोपण व लेझर सुविधा हॉस्पिटल मध्ये उपलब्ध असून सर्व उपचार एकाच छताखाली सेवा देणारे डेंटल केयर असून या सर्व सुविधांचा शहरातील व तालुक्यातील नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले व उपस्थितांचे आभार मानले.यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की,शेख व सरगुरु परिवार हा सेवाभाव  परिवार आहे.सर्व रुग्णांची सेवा या डेंटल केयर च्या माध्यमातून व्हावी ह्याच शुभेच्छा देतो.त्यानंतर माजी नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख यांनी स्पेशलाईज डॉक्टर्स औसा शहरात येत आहेत,हे शहराच्या विकासासाठी आनंदाची बाब आहे.खासकरून महिलांसाठी दंत वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत असून मी माझ्या घरच्यांना व आईला लातूरला पाठवत होतो पण आता आपल्या शहरात सुविधा उपलब्ध झाली हे निश्चितच सुखावह आहे.कार्यक्रमाचे उद्घाटक ह.भ.प.सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी डाॅ.शेख आर.आर.,डॉ.अमरीन शेख,अरबाज शेख,शेख रसूलसाब गुरुजी व कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या व तसेच कार्यक्रमास उपस्थितीतांना संबोधीत करताना म्हणाले की,शहरात अत्याधुनिक असे डेंटल हॉस्पिटल ची गरज होती आणि या हॉस्पिटलची संचालिका महिला डॉक्टर्स असल्यामुळे महिलांना याची खूप सुविधा होणार.शेख,सरगुरु परिवाराचे आमच्या घराण्याशी खूप जुने व आपुलकीचे संबंध आहेत.शेख परिवारांकडून असेच सामाजिक कार्य नेहमी घडत रहावो अशी मी शुभेच्छा देतो.त्यानंतर आमदार अभिमन्यू पवार यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की डाॅ.शेख आर.आर.यांनी कोविड च्या काळात तालुक्याच्या आरोग्य सुविधेसाठी खूप मेहनत घेतली आणि आता सुनेला सरकारी नौकरी लागत असताना देखील एक वैद्यकीय सेवेचा ध्यास म्हणून अत्याधुनिक असे डेंटल केअर हॉस्पिटल चालू केले हे औसा शहराच्या वैद्यकीय सुविधेमध्ये भर टाकेल हे निश्चितच एक आमदार म्हणून पहाताना शहराचा विकास होतं आहे याचं खूप आनंद आहे.

        यावेळी उद्घाटन सोहळ्यास सर्व सहकारी डॉक्टर्स,नातेवाईक, राजकीय,सामाजिक,शैक्षणिक व व्यापारी असे सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वरिष्ठ पत्रकार म. मुस्लिम कबीर यांनी केले तर आभार राहत डेंटल केयरचे संचालक अरबाज शेख यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या