आ. अभिमन्यू पवार व आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी घेेतली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री भेट
कायमस्वरूपी टिकेल असे आरक्षण मराठा समाजाला देण्याची मागणी
औसा - कायद्याच्या चौकटीत कायमस्वरूपी टिकेल असे आरक्षण मराठा समाजाला लवकरात लवकर देण्यात यावे या मागणीसाठी आमदार अभिमन्यू पवार व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन या संदर्भात सविस्तर चर्चा केली.
मराठा समाजाची स्थिती दिवसेंदिवस भयानक होत चालली आहे. शिक्षणात आणि नौकरीत आरक्षण नसल्याने समाजातील मुले शिक्षणापासून व नौकरी पासून वंचित राहिली आहेत. यासाठी खऱ्या अर्थाने मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. आजवर सर्व जाती धर्माला सोबत घेऊन आलेल्या या समाजाची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट आहे. समाजाच्या उपजिवीकेचे शेतजमीन हे साधन असून अल्पभूधारक असलेला समाज निसर्गाच्या लहरीपणामुळे हे क्षेत्र अडचणीत आले असून खऱ्या अर्थाने मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे.सध्या मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातची मागणी जोर धरू लागली असून मराठा आरक्षण संदर्भात औशाचे आमदार अभिमन्यू पवार व तुळजापूरचे आमदार रणजितसिंह पाटील यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत याविषयी सविस्तर चर्चा केली. कायद्याच्या चौकटीत कायमस्वरूपी टिकेल असे आरक्षण मराठा समाजाला लवकरात लवकर देण्यात यावे अशी मागणी यावेळी दोन्ही आमदारांनी केली.
....................
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.