प्रवाशांची लूट थांबविण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन

 


प्रवाशांची लूट थांबविण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करा

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन 






    लातूर/प्रतिनिधी: दीपावलीच्या कालावधीत होणारी गर्दी लक्षात घेता खाजगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट केली जाते. वाहनात प्रवासी कोंबून धोकादायक वाहतूक केली जाते.हे थांबविण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करून तपासणी केली जावी,अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीकडून प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
     दीपावली मध्ये नोकरदार मंडळी आपापल्या गावाकडे परततात.कुटुंबियांसोबत सण साजरा करण्यासाठी सर्वजण गावाकडे येतात. यामुळे साहजिकच वाहनांना गर्दी होते.या संधीचा लाभ उठवत खाजगी ट्रॅव्हल्स व वाहतूकदारांकडून मोठ्या प्रमाणात भाडेवाढ केली जाते.याशिवाय अनेक वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसून बेकायदा वाहतूक सुरू असते.यात प्रवाशांची आर्थिक लूट होण्यासोबतच जीवितास धोका निर्माण होतो. त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाने भरारी पथकांची स्थापना करून प्रवाशांचे होणारे आर्थिक नुकसान थांबवावे तसेच धोकादायक परिस्थितीतील वाहतूक बंद करावी,अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
    या निवेदनावर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मिरकले पाटील,मंजुश्री ढेपे,कौशल्या मंदाडे, रजिया सय्यद आदींसह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
  प्रवाशांची गरज लक्षात घेवून भाडे वाढ करून जास्त दराने तिकीट घेऊन प्रवाशी ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स व खाजगी वाहतूक करणाऱ्याची प्रवाशांनी तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा ग्राहक संरक्षण समिती सदय दत्तात्रय मिरकले पाटील यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या