वंचित घटकांच्या दीपावलीसाठी पेपर रद्दी संकलन उपक्रम

 

वंचित घटकांच्या दीपावलीसाठी पेपर रद्दी संकलन उपक्रम
               

                                      
                                                    लातूर - दरवर्षीप्रमाणे याही  आदर्श मैत्री फाऊंडेशनच्या वतीने वंचित घटकांची दिपवाळी गोड करण्याच्या अनुषंगाने पेपर रद्दी संकलनाचा उपक्रम हाती घेतला आहे. लातूर शहरातील, परिसरातील सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की आपल्या घरातील पेपरची रद्दी ,नवीन साड्या आपण आदर्श मैत्रीच्या कार्यालयात किंवा संचालकाकडे दी 5 नोव्हेंबर पूर्वी सुपूर्द करून आपण आपल्या दीपावली प्रमाणेच समाजातील वंचित घटक ज्यांना दीपावली माहिती नाही किंवा ज्यांना दिपवाळी करणे शक्य नाही अश्यांचीदिवाळी गोड करण्यासाठी त्यांना दिपवाळी फराळ अभंग स्नानाचे किट व नवीन साड्या वाटप करण्यासाठी आपल्या घरातील पेपर रद्दी,नवीन साड्या देऊन सहभाग नोंदवावा.व आदर्श मैत्री फाऊंडेशनच्या उपक्रमास प्रतिसाद द्यावा. पेपर रद्दी संकलना साठी मोबाइल नं 9168 222 333 वर संपर्क साधवा असे आव्हाण आदर्श मैत्री फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार संचालक प्रा. शिवराज मोठेगावकर, तुकाराम पाटील, शशिकांत पाटील , निलेश राजमाने , सच्चिदानंद ढगे, ओमप्रकाश झुरळे , राजेश मित्तल, प्रमोद भोयरेकर, बाबुराव जाधव, सुधाकर तोडकर ,शिवाजी हांडे ,विवेक सौताडेकर, दासराव शिरुरे, संतोष बालगीर , राघवेंद्र   इटकर, शशिकिरण भिकाने , अरविंद औरादे ,संभाजी नवघरे ,अशोक तोगरे, सोनू डगवाले, चंद्रकांत कातळे , शिवाजी शिंदे, आसिफ शेख, उत्तम देशमाने, श्रीकांत हिरेमठ, सागर शिवणे, श्रावण चव्हाण ,अमोल जाणते ,सतीश पवार, महादेव पांडे, संपत जगदाळे ,महेश शिंदे, प्रवीण सूर्यवंशी, पद्माकर वाघमारे आदी नी केले आहे.                   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या