युध्द नको शांतता हवी लातुरात गांधी चौक येथे इस्त्राईल निषेधार्थ सर्व पक्षीय व सामजिक संघटना यांच्यावतीने धरणे आंदोलन
लातुर - लातुरात गांधी चौक येथे इस्त्राईल निषेधार्थ सर्व पक्षीय व सामजिक संघटना यांच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले याबाबत सविस्तर माहिती अशी की आंतरराष्ट्रीय स्थरावर इस्त्राईल हा देश हुकुमशाही पध्दतीने फिलिस्तीनवर रासायनिक हल्ले करुन संयुक्त राष्ट्राचे उल्लंघन करत आहे. ज्यामध्ये रुग्णालयावर हल्ला करुन निष्पाप नागरिकांना मारले जात आहेत ज्यात लहान बालके व महिला यांचा सहभाग आहे.
तसेच गाजा पट्टी यात हवाई हल्ले करुन ६७०० लोक मुत्यूमूखी पडले आहेत तर १० लाख लोक बेघर झालेले आहेत फिलिस्तीन येथील जिवन जगणे कठिण झाले असुन विदेशी मदत पुरवठा हि थांबवण्यात आला आहे विद्युत व पाणी पुरवठा बंद आहे तसेच जीवनावश्यक वस्तुचा पुरवठा इस्त्राईल ने थांबवला असुन आम्ही भारतीय म्हणून निषेध करतो. कारण भारत देशाने मानवतेला प्राधान्य दिलेलं आहे. कोरोना काळात जगात लस पुरवठा करुन मानवतावादी विचार व मानवतेचा संदेश दिलेला आहे तेव्हा भारताने मानवतेचा विचार करून इस्त्राईल सोबत चे आर्थिक, राजकीय, वस्तू पुरवठा आयात निर्यात बंद करण्यात यावी अशी आमची मागणी आहे हुकुमशाह पंतप्रधान इस्त्राईल बेंजामिन नेतन्याहू चा निषेध करत आहोत संयुक्त राष्ट्राने हुकुमशाह पंतप्रधान इस्त्राईल बेंजामिन नेतन्याहू आंतरराष्ट्रीय खटला चालवावा व फिलिस्तीन यांना न्याय देण्यात यावा अशी आमची मागणी आहे.
यावेळी निवेदन तहसीलदार द्वारे महामहिम राष्ट्रपती, पंतप्रधान, रक्षामंत्री, गृहमंत्री भारत सरकार व जिल्हाधिकारी यांना माहितीस्तव स्वाक्षरीने निवेदन देण्यात आले आहे
निवेदनावर अॅड. मुहम्मद अली शेख अॅड .शमीम शेख , कलीम रजा़ कुरैशी , सय्यद इमरान , असदमामु खोरीवाले, वाजीद मणीयार,अॅड मुश्ताक सौदागर, अॅड ला.रा.शेख , सय्यद सरफराज, सरफ़राज मणीयार, सह मान्यवर यांच्या स्वाक्षरीने निवेदन देण्यात आले असुन सर्वपक्षीय नेते पदाधिकारी तथा सामाजिक संघटना अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.