रामनाथ विद्यालयात रक्तगट तपासणी शिबिर संपन्न

रामनाथ विद्यालयात रक्तगट तपासणी शिबिर संपन्न







आलमला :-श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलमला. ता. औसा. येथे दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी 5 वी  ते 12 वी च्या  विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन श्री शिवलिंगेश्वर बी फार्मसी. कॉलेजचे प्राचार्य श्री विश्वेश्वर धाराशिवे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.अनिता पाटील या उपस्थित होत्या. शासनाने युडायस साठी शालेय विद्यार्थ्यांचा रक्तगट तपासणी माहिती भरण्यासाठी सर्वांना शक्तीचे केले असल्यामुळे श्री रामनाथ शिक्षण संस्था व श्री विश्वेश्वर शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने  या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम संस्थेच्या वतीने प्राचार्य विश्वेश्वर धाराशिवे ,डॉ.सचिन हंगरगेकर,  प्रा.विकास मुंगळे, प्रा. बळीराम लवटे या मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शालेय जीवनापासून  जर आपला रक्तगट माहीत असेल तर विद्यार्थ्यांना त्याचा भविष्यामध्ये उपयोग होऊ शकतो या हेतूने दोन्ही शिक्षण संस्थेच्या वतीने या कॅम्पचे आयोजन विद्यालयात करण्यात आले होते .एकूण 600 विद्यार्थ्यांची एकाच दिवसांमध्ये रक्तगट तपासणी करून प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांचा रक्तगट माहिती करून देण्यात आला. या कार्यक्रमासाठी विश्वेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव बसवराज धाराशिवे व दगडोजीराव देशमुख डी.फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.कैलास कापसे यांनी सदिच्छा भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांबरोबर आपल्याही रक्तगटाची तपासणी करून घेतली व शिबिरांला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्राचार्य विश्वेश्वर धाराशिवे यांनी सर्व विद्यार्थ्यांना फार्मसी कॉलेज विषयी थोडक्यात माहिती सांगितली व पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री पाटील पी.सी, सहशिक्षक भास्कर सूर्यवंशी, प्रशांत हुरदळे ,फाजल फैयाज, सौ.उकरडे डी.आर ,  शिरीष धाराशिवे .व दगडोजीराव देशमुख डी.फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सर्वांच्या रक्तांचे तपासणी करून गट काढून देण्यासाठी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या