परमेश्वरांची आणि आई-वडिलांची सेवा हाच खरा धर्म मौलाना सईद साहब बीड वाले

 परमेश्वरांची आणि आई-वडिलांची सेवा हाच खरा धर्म मौलाना सईद साहब बीड वाले







औसा प्रतिनिधी 

 स्वच्छ आणि निर्मळ मनाने परमेश्वराची मनापासून भक्ती केल्यास परमेश्वर दयाळू असल्यामुळे सर्वांनाच परमेश्वर भक्तीचे निश्चित फळ मिळते परमेश्वरासोबतच आई-वडिलांची सेवा करणे हाच खरा धर्म आहे असे प्रतिपादन मौलाना सईदसाब बीड वाले यांनी केले. औसा येथे दोन दिवशीय इस्तेमा कार्यक्रमात धर्म उपदेश करताना मौलाना सईद साहब बीड वाले बोलत होते. प्रत्येक नागरिकांनी धर्माचरण करून धर्माच्या रीती रिवाजाचे अनुकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या मुला मुलींना चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊन संस्कार घडविणे अत्यंत गरजेचे आहे. तरुण पिढीने व्यसनापासून दूर होऊन आपल्या कुटुंबाचा सक्षम आधार होऊन आई-वडिलांची प्रामाणिकपणे सेवा करावी प्रत्येकाने आपल्या कामाप्रती प्रामाणिक असणे गरजेचे आहे तसेच कोणतेही काम करीत असताना फळाची अपेक्षा न करता होणे महत्त्वाचे असते असे सांगून भव्य इस्तेमा कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या बांधवांना अतिशय उत्कृष्टरित्या धर्म उपदेश केला. सर्व धर्मा प्रति आदर भाव बाळगून आपले आचरण असणे हाच खरा मानवधर्म आहे असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले. औसा तालुकास्तरीय इस्तेमासाठी तालुक्यातून हजारो बांधव लातूर रोड नजीक असलेल्या उर्दू शाळेच्या मैदानावर उपस्थित होते. तालुकास्तरीय इज्तेमा कार्यक्रमांमध्ये तरुणांनी उत्तम व्यवस्था केली होती तर वाहनाची शिस्त व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिस्तीचे पालन करण्यासाठी शेकडो स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. दिनांक 19 नोव्हेंबर शनिवार रोजी सामूहिक नमाज पठण करून उपस्थित आणि अल्लाहाकडे दुवा मागितला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या