आंतरराष्ट्रीय उर्दू दिन ते राष्ट्रीय उर्दू दीनापर्यंत उर्दूच्या विकास व संवर्धनासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन नजीर मुन्शी गौरव समितीचे प्रतिपादन

 आंतरराष्ट्रीय उर्दू दिन ते राष्ट्रीय उर्दू दीनापर्यंत

उर्दूच्या विकास व संवर्धनासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन

नजीर मुन्शी गौरव समितीचे प्रतिपादन





सोलापूर- जे लोक समाजाच्या लोकांसाठी सतत वेगवेगळ्या स्वरूपात आपले कार्य करत असतात त्यांचे कार्य समाजाच्या लोकांसाठी प्रेरणादायी आणि हे सर्व कार्य नजीर मुन्शी यांनी केलेले आहे. त्यामुळे त्यांचा आदर्श समाजातील इतर लोकांनी घेऊन आपले कार्य पुढच्या पिढीसाठी चालू ठेवावे. शैक्षणिक व साहित्यिक सेवेचे कौतुक व्हावे व अशा कार्यांना राष्ट्रात बळ व विस्तार व्हावा या हेतूने नजीर मुन्शी सत्कार गौरवची स्थापना करण्यात आली.  नाजीर मुन्शी यांच्या सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक सेवेची पावती देण्यासाठी या समितीअंतर्गत एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  

दि. 9 नोव्हेंबर 2023 आंतरराष्ट्रीय उर्दू दिन ते दि. 15 फेब्रुवारी 2024 राष्ट्रीय उर्दू दिनपर्यंत विविध सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक उपक्रम तसेच क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. हे सर्व उपक्रम सोलापूरच्या विविध प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, वरिष्ठ महाविद्यालये व विद्यापीठे आणि सोलापूरच्या बाहेर मुंबई,  भिवंडी,  पुणे,  औरंगाबाद,  बीड,  प्रभाणी,  सांगली,  नांदेड,  मालेगाव,  उदगीर,  लातूर, औसा,  कोल्हापूर,  इचलकरंजी या ठिकाणी आयोजित करण्याचे योजिले आहे. 

या उपक्रमामध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक संस्थांच्या सहकार्याने निबंध लेखन, भाषण स्पर्धा, सुलेखन, चित्रकला स्पर्धा, गणित ऑलिम्पियाड, प्रतिभा चाचणी, शैक्षणिक चर्चा, मुशायरा, करिअर मार्गदर्शन कार्यक्रम, शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यक्रम, समाजसेवकांना पुरस्कार, ग्रंथालय भेटी, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ऑनलाइन प्रश्नमंजुषा, चर्चासत्रे आणि विविध क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातील.

नजीर मुन्शी यांच्या सेवेचा गौरव म्हणून या उपक्रमांचा शुभारंभ कार्यक्रम नजीर मुन्शी यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आला. या सर्व उपक्रमांचे नियोजन या कार्यक्रमात करण्यात आले. 

कार्यक्रमाची सुरुवात महेबुब कुमठे च्या कुराण पठणाने झाली. मेहमूद नवाज यांनी पाहुणे व उपस्थितांचे स्वागत केले. मोहम्मद शफी चोबदार यांनी कार्यक्रमाचे स्वरूप व प्रास्ताविक केले. अयुब नल्लामंदू, अयुब मंगलगिरी, याकूब मंगलगिरी, अन्वर कमिशनर, नासिरुद्दीन आळंदकर, मेहबूब कुमठे, शकील खैरदी, शफी कॅप्टन, इलियास शेख, डॉ. अब्दुल रशीद शेख, अब्दुल मन्नान शेख, अखलाक पटेल, इलाही जमादार, लियाकत शेख यांनी नजीर मुन्शी यांचे उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इक्बाल बागबान, शकील कादरी, मजहर अल्लोळी, इम्रान अलमेलकर, वसीम नल्लामंदू, मुज्जमिल बागबान यांनी परिश्रम घेतले. इक्बाल अन्सारी, अयुब खान, अकील मुन्शी, आरिफ शेख, मुनाफ शेख, हुसेन साहिब शेख, मौला अली लोकापली, इकबाल पठाण, रफिक खान, इक्बाल हुंडेकरी, सय्यद वसीक यांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. आभार प्रदर्शन प्रा.जैनुद्दीन पटेल यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या