स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी, 03 मोटरसायकल जप्त. 3 गुन्हे उघडकीस, 01आरोपी अटक



             

 *स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी, 03 मोटरसायकल जप्त. 3 गुन्हे उघडकीस, 01आरोपी अटक





 लातूर रिपोर्टऱ (प्रतिनिधी )या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक  गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.

             पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषतः मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते .

                   त्या अनुषंगाने सदर पथके माहितीचे संकलन करीत असताना, माहिती घेत असताना दिनांक 29/11/ 2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार नामे अमजद उर्फ इस्माईल पटेल हा बाभळगाव नाका,रिंग रोड  परिसरात फिरत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर पथक तात्काळ बाभळगाव नाका परिसरात पोचून रोडवर मोटार सायकलसह थांबलेल्या इसमाला विश्वासात घेऊन  विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव 


1) अमजद उर्फ इस्माईल गफूर पटेल, वय 29 वर्ष, राहणार रावणगाव,तालुका उदगीर जिल्हा लातूर सध्या राहणार वैशाली नगर, बाभळगाव तालुका जिल्हा लातूर  असल्याचे सांगितले.


                 तसेच त्यांच्या ताब्यात असलेल्या वाहना संदर्भाने विचारपूस केली असता सांगितले कि, सदरची   मोटर सायकल काही दिवसापूर्वी लातूर शहरातून चोरी केलेली आहे. तसेच लातूर शहरातील विविध ठिकाणाहून त्याच्या आणखीन मोटारसायकली चोरी केल्याचे सांगितले. 

        त्यावरून गुन्ह्यातील नमूद आरोपीला ताब्यात घेऊन त्यांनी लातूर शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरी केलेल्या मोटारसायकल बाबत विचारपूस करुन नमूद आरोपीकडून चोरीच्या आणखीन इतर 2 अशा मिळून एकूण 3 विविध कंपनीच्या मोटारसायकली ज्याची एकूण किंमत  70 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.


                      मोटार सायकल चोरीचे पोलीस ठाणे शिवाजीनगर येथील मोटार सायकल चोरीचा एक , एमआयडीसी पोलीस ठाणे मधील मोटरसायकल चोरी एक  गुन्हा व गांधी चौक पोलीस ठाण्याला दाखल असलेला मोटरसायकल चोरीचा एक गुन्हा असे एकूण तीन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. पुढील कार्यवाहीस्तव नमूद आरोपींना पोलीस ठाणे शिवाजीनगर च्या ताब्यात देण्यात आल्या असून संबंधित पोलीस ठाणेचे पोलीस पुढील तपास करीत आहेत.


             सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे मार्गदर्शनात  पोलीस अंमलदार माधव बिल्लापट्टे, नवनाथ हासबे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, राजाभाऊ मस्के, तुराब पठाण, जमीर शेख, नकुल पाटील यांनी पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या