महिलांच्या गळ्यातील गंठण चोरणाऱ्या टोळीला दोन गंठण व चोरीच्या चार मोटारसायकलसह अटक. 05 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. शिवाजीनगर पोलीस ठाण्याची दमदार कामगिरी*


महिलांच्या गळ्यातील गंठण चोरणाऱ्या टोळीला दोन गंठण व चोरीच्या चार मोटारसायकलसह अटक. 05 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. शिवाजीनगर पोलीस ठाण्याची दमदार कामगिरी*







लातूर (प्रतिनिधी ) याबाबत थोडक्यात हकीकत अशी की,  राजीव गांधी चौक परिसरातून सकाळी भाजीपाला खरेदी करून घरी जात असताना दोन अज्ञात मोटरसायकल स्वराने महिलेच्या गळ्यातील मिनी गंठण हिसकावून नेहल्याची घटना घडली होती. त्यावरून पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे येथे गुरनं  581/2023 कलम 392,34 भादवी. प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला होते.
              सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी निर्देशित करून महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर श्री. जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे शिवाजीनगर  चे पोलीस निरीक्षक श्री. दिलीप सागर यांचे नेतृत्वात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय लातूर शहर व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार यांचे तपास पथक नेमुन तपासा बाबत सूचना  देण्यात आले होते.
          तपासा दरम्यान पोलीस पथक गुन्ह्याची पद्धत व इतर बाबींचा विश्लेषण करून तसेच गोपनीय बातमीदार नेमून माहिती मिळवण्याचा कसोशीने प्रयत्न करीत होते. दरम्यान तपास पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारावरून संशयित आरोपीचा पुणे, हडपसर, टेंभुर्णी निलंगा व लातूर शहरातील विविध भागात शोध घेऊन दिनांक 26/11/2023 रोजी आरोपी नामे
1) सुशील सुनील नाथभजन, वय 19 वर्ष, राहणार राजे शिवाजीनगर लातूर.
2) आकाश उर्फ महेश रमेश टेळे, वय 25 वर्षे, राहणार राजे शिवाजीनगर लातूर.
3)  एक विधी संघर्ष बालक.
 
यांना त्यांचे राहते ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले. त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनीच नमूद गुन्ह्यातील महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावून चोरी केल्याचे कबूल केले तसेच पोलीस ठाणे एमआयडीसी हद्दीतूनही एका महिन्याचे गंठण चोरल्याचे कबूल करून लातूर शहरातील विविध भागातून काही मोटारसायकली चोरल्याचेही कबूल केले आहे.
            नमूद आरोपींनी चोरलेले दोन सोन्याचे गंठण व चार मोटारसायकली असा एकूण 5 लाख 29 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 
               नमूद आरोपींचाकडून आणखीन गुन्हे उघड केस येण्याची शक्यता असून गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पोगुलवार व पोलीस अमलदार धैर्यशील मुळे करीत आहेत.
                नमूद तपास पथकाने वरिष्ठांचे मार्गदर्शनात अतिशय कुशलतेने, गुन्ह्याच्या पद्धतीचा बारकाईने विश्लेषण व अभ्यास करून, गोपनीय माहिती मिळवून गुन्ह्यात चोरीस गेलेले सोन्याचे गंठण परत मिळविले आहे.
                सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठांचे व उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर श्री.भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक दिलीप सागर,पोलीस ठाणे विवेकानंद चे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांचे नेतृत्वातील टीम मधील सहाय्यक उपनिरीक्षक रामचंद्र ढगे ,भीमराव बेल्हाळे , पोलीस अंमलदार युवराज गिरी, संजय कांबळे, महेश पारडे, गोविंद चामे, अभिमन्यू सोनटक्के, बालाजी कोतवाड, बळवंत भोसले ,प्रशांत ओगले, विनोद चालवाड, काकासाहेब बोचरे, अमित लहाने यांनी चोरीच्या गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करून गुन्ह्याची उकल करून गुन्हा उघडकीस आणून, गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्याची कामगिरी बजावली आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या