*महिलाच्या गळ्यातील गंठण चोरणारे तीन अल्पवयीन मुलांकडून 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.*
लातूर (प्रतिनिधी )मिनी गंठण चोरणाऱ्या गुन्ह्यातील अल्पवयीन बालकाकडून 15 ग्राम सोन्याचे गंठणसह 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे विवेकानंद ची कामगिरी.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, दिनांक 19/12/2023 रोजी रात्री नऊ वाजता पोलीस ठाणे विवेकानंद चौक हद्दीतील विराट नगर परिसरातून एका महिलाच्या गळ्यातील 15 ग्राम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात आरोपींनी जबरदस्तीने हिसकावून घेऊन पळून गेल्याची घटना घडली होती. त्यावरून पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या चोरी व चैन स्नॅचिंग चे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता आदेशित केले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे स्तरावर पोलीस अधिकारी/अमलदारांचे पथक तयार करून सदर पथकामार्फत गुन्ह्यांचा तपास करण्यात येत होता.
दरम्यान विवेकानंद पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे चोरलेले सोन्याचे मिनी गंठण विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन अल्पवयीन/विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता ते लातूर जिल्ह्यातील लगतच्या तालुक्यातील राहणारे असून लातूर मध्ये वेगवेगळ्या महाविद्यालयात शिक्षण घेत असून एका होस्टेलमध्ये राहतात. नवीन मोबाईल घेण्यासाठी व मौजमजा करण्यासाठी पैसे मिळवण्यासाठी घरासमोर शतपावली करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील गंठण बळजबरीने हिसकावून घेऊन पळून गेल्याचे सांगितले. तसेच नमूद तीन विधी संघर्ष बालकांकडून गुन्ह्यात चोरलेला सोन्याचा मिनीगंठण जप्त करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास व विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक एन.डी.लिंगे हे करीत आहेत.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक एन.डी.लिंगे, पोलीस अमलदार विनोद चलवाड, अतुल काळे यांनी केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.