बँकेच्या माध्यमातून ग्राहकांचा विश्वास संपादन करा - मा. नवनीत भंडारी
लातुर - लातूर को - ऑपरेटिव्ह बॅंक मुख्यालय येथे महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित. पुणे यांचे अंतर्गत (सहकारी शिक्षण , प्रशिक्षण, प्रचार , प्रसिद्धी, करणारी शिखर संस्था ), सहकार प्रशिक्षण केंद्र, लातुर व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यांच्यावतीने तीन दिवसीय सहकार प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील समारोप कार्यक्रमात लातुर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सहकार प्रशिक्षण मार्गदर्शन म्हणून बोलताना नवनीत भंडारी म्हणाले की, बँकेच्या माध्यमातून ग्राहकांचा विश्वास संपादन करून ग्राहकांना सेवा देणे गरजेचे आहे. आज जेष्ठ नागरिक हे सर्वाधिक ठेवी ठेवत असुन त्यांच्या विश्वासाला तडा जाता कामा नये तसेच कर्मचाऱ्यांनी कर्जाची विनम्रतापुर्वक वसुली करावी असे बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी श्री कांबळे साहेब, एस आर कोळी, अब्दुल समद शेख , महेश कोराळे यांनीही मनोगत व्यक्त करून उपस्थित प्रशिक्षणार्थीं यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या बँक मार्गदर्शन शिबिरात जिल्ह्यातील बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखाधिकारी, विषेश वसुली अधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.