माखन तुमचे , आमची सायमग बघा, अल्पसंख्याक दिनाची गरज काय ?

 माखन तुमचे , आमची सायमग बघा, अल्पसंख्याक दिनाची गरज काय ?







१८ डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक दिवस म्हणून साजरा केला जातो सन २००८ मध्ये  न्यायाधीश राजेंद्र सच्चर व रंगनाथ मिश्रा आयोगाच्या शिफारशींनुसार माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मागास अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी व न्यायासाठी  तसेच  अल्पसंख्याकांच्या विकास  घडवण्यासाठी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी १५ कलमी कार्यक्रम सुरु केला  या कार्यक्रमाची  अमंलबजावणी व्हावी  यासाठी प्रत्येक वर्षी अल्पसंख्याक दिन साजरा करण्याचे ठरवले  मुस्लिम,ख्रिश्चन, बौद्ध, पारशी, शीख, आणी जैन समाज अल्पसंख्याक आहेत  न्यायधीश राजेंद्र सच्चर समीती व न्यायधीश रंगनाथ मिश्रा आयोगाच्या निगराणीखाली अत्यंत बारकाईने मुस्लिम समाजाच्या समस्या,  सामाजिक, राजकीय,  आर्थिक,  शैक्षणिक,  इ. सर्व अभ्यास पुर्ण करून मुस्लिम समाजाची अत्यंत वाईट परिस्थिती हि व त्यावर उपाय महत्वपूर्ण  शिफरस  सरकार समोर सादर केल्या  रंगनाथ मिश्रा समितीने मुस्लिमांना आरक्षण देणे अत्यंत गरजेचे असल्याचे ठासुन  सांगितले  त्यानुसार  महाराष्ट्र राज्यात सन २०१४ मध्ये  नौकरी व शिक्षणात  मराठा समाजास १६%   मुस्लिम समाजाच्या आरक्षणास न्यायालयाने स्थगिती देत मुस्लिम समाजाला शिक्षण प्रवेशासाठी  ५% आरक्षण कायम ठेवले आहे  न्यायधीश सच्चर समीती अहवाल पान क्रमांक ५९ नुसार देशातील मुस्लिम अनुसुचित जाती आणी जमातीपेक्षा मागास आहेत मग अनुसुचित जाती जमाती आणि जमातींना शैक्षणिक आरक्षणाबरोबर नौक-यामध्येही आरक्षण मिळाले आहे  तर मुस्लिमांना नौक-यामध्ये आरक्षण का नाही    तसेच  रंगनाथ मिश्रा समिती,  अब्दुल रहेमान अभ्यास गट यांनी मुस्लीम समुहाला १०% आरक्षणाची शिफारस केलेली होती पण ५% आरक्षण दिले व तेही  न्यायालयाने  कायम ठेवले पण भाजप सेना युतीने न्यायालयाच्या आदेशानुसार अमंलबजावणी केली नाही असा अन्याय झाला  हे नाकारता येणार नाही
 भारताच्या स्वातंत्र्याचा लढ्यातील क्रांतिकारी मुस्लिम सेनानी यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली घर संसार उध्वस्त केले पण स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध बंड करून देश स्वातंत्र्य केला हा इतिहास आहे  पण आज भाजपचे केद्रिंय शासन व राज्य शासन नको त्या पध्दतीने अल्पसंख्याक समाजावर उठसुठ  तोंडसुख भाषणाने व्यासपीठ गाजवताहेत तर प्रसिद्धी माध्यमातून हा आरोपीच्या पिंज-यात उभे केले जात आहे हि वस्तुस्थिती आहे  कारण मुस्लिम  समाजाला दिशा देणारे राजकीय नेतृत्व नाही नव्हे ते राजकीय पक्षाने लादले जे समाज स्विकारत नाही  देशाच्या  हिताचे जेव्हा निर्णय घेतले जातात तेव्हा  अल्पसंख्याक समुहावर नको ते आरोप प्रत्यारोप होताहेत कारण कि अल्पसंख्याक  मधील मुस्लिम  समाज हा भावनिक आहे  लहान वयातच त्याला शिक्षणाची गोडी देंण महत्वाची आहे तेव्हा तो वडील यांच्या व्यवसायाशी  जुळतो व शिक्षणापासून दुरावतो मग जे काम हाताला पडेल तो करतो हातगाडा, भंगार, मजुरी, गॅरेज, पानटपरी, हॉटेल, सारख्या व्यवसायाला महत्व देतो कारण की  नियोजित ऊर्दू  माध्यमातून शिक्षण घेत असतांना. अल्पसंख्यक  शिक्षणसंस्था या मालकीच्या आहेत असे संस्थाचालक वावरत आहेत तर शासनही अनदेखी करतंय कारण कि शिक्षणाच्या मुळ प्रवाहात न आलेला बरा असाच प्रकार चालू आहे कारण कि मुस्लिम मुलांना शिक्षणाचा अभाव कमींच आहे जेमतेम शिक्षण मिळतं 
कारण कि लोकसभा खासदार असो कि  राज्याचा आमदार हे प्रमाण कमी झाले कारण की मुस्लीम नेता व नेतृत्व नाही आहे  ते स्व:हित व पक्ष हित जोपासत बसणारे तर मुस्लिम मतदार हा कोणत्याही एक पक्षा सोबत नसल्याने मताची विभागणी होत आहे त्याचा सरळ फायदा भाजपा ला होत असल्याने व भाजपा सरळ मुस्लिम विरोधात भाषा व निर्णय घेत असल्याने  मुस्लिम युवकांना दिशा देणारे नेतृत्व नाही  त्यामुळे मुस्लिम युवक दिशाहीन आहे  त्यामुळे तो राजकीय नेतृत्व व नेते  यांचा जयजयकार व सतरंज्या उचलणं यातच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसन्न आहे  कारण त्याला शिक्षण व लेखनीची जोडच माहित नाही  अगीच...स्वंयघोषीत नेतृत्व म्हणून उठाठेव करतोय हिच खंत आहे पण समाजातील काही  प्रमाणात  उच्च शिक्षीत शिक्षणाच्या प्रवाहात आहेत तेच आपल्या  पांल्याना उच्च शिक्षण  देतात पण सामान्य माणसाच्या  मुला / मुलींसाठी शिक्षण मिळतं कठीण  शिक्षणाच बाजारीकरण होत दानवीर ,  दानशुर , यांनी  समाजहितासाठी पुढे  येण्याची गरज आहे  कारण अल्पसंख्याक दिवस हा साजरा होत असतांना अधिकारी हे उदासीन आहेत तर समाज हि जागृत नाही  त्यांच्या हि मते काय फायदा म्हणून  मोकळे  होणं एवढंच आहे  पण येणा-या भविष्य काळात युवकांना प्रेरीत करण्यासाठी त्यांचे  अंधकारमय जीवनात प्रकाशमय जिवन उज्वल होण्यासाठी  सुशिक्षीत समुहातून पुढाकार घेणे आवश्यक आहे अन्यथा युवा पिढी  आम्हाला माफ करणार नाही एवढे मात्र निश्चित यासाठी  मुस्लिम समाजाच्या हितासाठी आपल्या देशासाठी बलिदान देणारे मुस्लिम स्वातंत्र्य सेनानी घडवण्यासाठी  भारत देशाला महासत्तेचे स्वप्न  राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी दाखवले त्या दिशेने वाटचाल करु यासाठी   मुस्लिम समाजाला सत्ताधारी यांना  सोबत घ्यावेच लागेल तरच ख-या अर्थात आम्ही महासत्ताचे स्वप्न पूर्ण होवोत याकडे वाटचाल करु  तेव्हाच माखन तुमचे , आमची सायमग बघा, अल्पसंख्याक दिनाची गरज काय ? हे दिसुन येईल  पाहुयात  अल्पसंख्याक हक्क दिवस कसा साजरा 
१८ डिसेंबर अल्पसंख्याक दिनाच्या निमित्ताने  
अब्दुल समद शेख 
९४२३७१९९५७

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या