महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण चोरणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. 2 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.
लातूर (प्रतिनिधी ) मंगळसूत्र गंठण चोरणाऱ्या गुन्ह्यातील आरोपीला अटक. 33.5 ग्राम सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 2 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. 3 गुन्हे उघड. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या चोरी व चैन स्नॅचिंग चे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता आदेशित केले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी/ अमलदारांचे पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकामार्फत जिल्ह्यातील विविध गुन्हेगारांची माहिती एकत्र करून त्याचे विश्लेषण करण्यात येत होते. तसेच गोपनीय बातमीदार नेमून त्यांच्याकडून माहिती घेण्यात येत होती.
दरम्यान 15/12/2023 पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून चोरलेले सोन्याचे दागिने विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव
1) शिवाजी सुभाष घोलप,वय 33 वर्ष, राहणार जागजी तालुका धाराशिव (उस्मानाबाद)
असे असल्याचे सांगितले. नमूद आरोपीला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्याने सांगितले की, तो व त्याच्या सोबत असलेल्या आणखीन काही महिला साथीदाराच्या मदतीने मागील काही महिन्यापासून लातूर शहरातील व जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बस स्थानकामध्ये गर्दीचा फायदा घेऊन, बस मधून चढ-उतार करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण चोरून निघून जाण्याचे गुन्हे केल्याचे कबूल केले.
त्यावरून लातूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचे अभिलेखाची माहिती घेतली असता पोलीस ठाणे औसा येथील मंगळसूत्र चोरीचे 2 गुन्हे, पोलीस ठाणे गांधीचौक येथील 1 गुन्हा,असे दाखल असल्याचे दिसून आले आहेत.
नमूद आरोपींनी वर गुन्ह्यात चोरलेला सोन्याचे 33.5 ग्रॅम वजनाचे 3 मंगळसूत्रे, गंठण तसेच एक कार असा एकूण 2,65,500/-रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड,पोलीस अमलदार माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, राजेश कंचे, तुराब पठाण, जमीर शेख, मोहन सुरवसे, चंद्रकांत डांगे, रामहरी भोसले, रवी कानगुले, संतोष खांडेकर, सचिन मुंडे, आळणे यांनी केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.