विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी शनिवारी
24 गावांमध्ये जाणार ‘विकसित भारत संकल्प यात्रा’
लातूर, दि. 15 (जिमाका) : केंद्र शासनाच्या विविध योजना समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहचाव्यात, तसेच त्यांना या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ही विशेष मोहीम 24 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत लातूर जिल्ह्यात राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत शनिवार, 16 डिसेंबर 2023 रोजी जिल्ह्यातील 24 गावांमध्ये चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण, नाव नोंदणी करण्यात आहे. तरी संबंधित गावातील नागरिकांनी या उपक्रमास उपस्थित राहण्याचेआवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत मिशन, कृषि विभागाच्या योजना, माय भारत, धरती कहे पुकार के आदी योजनांची माहिती देण्यात येत आहे. तसेच लाभार्थ्यांच्या यशोगाथा दाखविण्यात येत असून या योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान करणे, त्यांना लाभाचे वितरण करणे, वंचित लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे.
16 डिसेंबर,2023 रोजी अहमदपूर तालुक्यात सकाळी खरबवाडी, दुपारी अंधोरी, औसा तालुक्यात सकाळी बोरगाव न. व लोहटा, दुपारी अंदोरा व सारणी, चाकूर तालुक्यात सकाळी झरी बु., दुपारी बेलगाव, देवणी तालुक्यात सकाळी तळेगाव, दुपारी अचवला, जळकोट तालुक्यात सकाळी जगळपूर, दुपारी उमरगा रेतू, लातूर तालुक्यात सकाळी सलगरा बु. व कव्हा, दुपारी सलगरा खु. व साखरा, निलंगा तालुक्यात सकाळी बडूर व आनंदवाडी अबु., दुपारी औंढा व झरी, रेणापूर तालुक्यात सकाळी कुंभारवाडी, दुपारी आंनदवाडी, उदगीर तालुक्यात सकाळी हिप्परगा, दुपारी खेर्डा येथे विकसित भारत संकल्प यात्रा जाणार आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.