अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा करा तसेच अल्पसंख्यांक कल्याण समिती गठीत करा जिल्हाधिकारी लातूर कडे मागणी
औसा (प्रतिनिधी )सविस्तर वृत असे क़ी एम.आय.एम. व अल्पसंख्यांक समाजाच्या वतीने आपणास निवेदन सादर करतो की, दि. १८ डिसेंबर हा दिवस अल्पसंख्यांक समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी स्थानिक समस्या सोडविण्यासाठी शासनाने पंतप्रधानांच्या पंधरा कलमी कार्यक्रम अंमलबजावणीचा आढाचा घेणे व अन्य कार्यासाठी दि. ७ ऑक्टोबर २००५ रोजी समितीची स्थापना झालेली आहे च आदेश ही जारी करण्यात आले होते की, दर महिन्याला एक बैठकही घेण्याचे सूचित केले होते. मात्र तालुक्यात या आदेशाची अंमलबजावणी होत नाही किंवा त्याची माहिती अल्पसंख्यांक समाजाला देण्यात येत नाही. वारंवार मागणी करुनही जिल्ह्यात अल्पसंख्यांक कल्याण समिती गठीत करण्यात आलेली नाही. व प्रत्येक तालुक्यात अल्पसंख्यांक कल्याण समिती गठीत करण्यात यावी. ज्यामुळे अल्पसंख्यांक समस्या निकाली निघतील.
तरी मे. साहेबांनी १८ डिसेंबर रोजी अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा करण्यात यावा म्हणून तालुक्यातील संबंधीत सर्व कार्यालयांना आदेशीत करण्यात यावे अशी मागणी
सय्यद मुजफ्फरजेली इनामदार एम.आय.एम. प्रमुख, औसा यांनी जिलाधिकारी लातूर कडे केली आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.