*विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरणाऱ्या टोळीला अटक. चोरीचे 20 मोबाईल, किंमत 1 लाख 59 हजार रुपयाच्या मुद्देमालासह तीन आरोपींना अटक. वरिष्ठाचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.*
लातूर (प्रतिनिधी )याबाबत थोडक्यात माहिती की, पोलीस ठाणे एमआयडीसी हद्दीमधून परीक्षा हॉल बाहेर बॅग ठेवून परीक्षेसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचे मोबाईल बॅगसह चोरून नेल्याची घटना घडली होती. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे एमआयडीसी येथे कलम 379 भादवी प्रमाणे गुन्हे दाखल झाले होते. तसेच इतर पोलीस स्टेशनला देखील मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
सदरचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेशित केले होते. त्यावरून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदारांचे पथके तयार करून त्यांना सखोल मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या होत्या. सदर पथकाकडून गुन्ह्या संदर्भात बारकाईने तपास सुरू असताना मोठ्या प्रमाणात बातमीदार नेमून तसेच तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेण्यात येत होते.
वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदरच्या पथकांनी केलेल्या परिश्रमामुळे पथकांना गुप्त बातमीदाराकडून मोबाईल चोरीचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती मिळाली.
सदर माहितीची बारकाईने अभ्यास व विश्लेषण करून मोबाईल चोरी करणारे व ते मोबाईल कमी किमतीत लोकांना विकणाऱ्या आरोपींची टोळी निष्पन्न करून टोळी टोळीतील सदस्यांना त्यांच्या राहते ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर पथकांनी अतिशय कुशलतेने व उत्कृष्टपणे नमूद गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन खालील आरोपींना मोबाईल व विद्यार्थ्यांच्या ब्यागसह ताब्यात घेण्यात आले.
1) ऋषिकेश उर्फ भुऱ्या सुरेश कुरे, वय 19 वर्ष राहणार रेणापूर सध्या राहणार राजे शिवाजीनगर, पाखर सांगवी लातूर.
2) दिनेश दयानंद पवार वय 19, वर्ष, राहणार हरंगुळ बुद्रुक सध्या राहणार महिंद्रा शोरूम च्या पाठीमागे बार्शी रोड लातूर.
3) सोमेश राम हिप्परगे, वय 19 वर्ष, राहणार मुरुड सध्या राहणार विक्रम नगर, पाण्याच्या पाठीमागे लातूर.
यांना दिनांक 15/01/2024 रोजी आरोपींना त्यांचे राहते ठिकाणाहून ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे कबुल केले.त्यांनी वर नमुद गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल विविध कंपनीचे 20 मोबाईल एकूण 1 लाख 59 हजार रुपयाचा मुद्देमाल व तीन बॅग हजर केल्याने वरील आरोपींना वर नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे मोबाईल चोरीचे 2 गुन्हे उघड झाले असून मोबाईल चोरीचे आणखीन गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे एमआयडीसी करीत आहेत.
वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस पथकांनी अतिशय उत्कृष्टरित्या तपास करून मोबाईल चोरणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस अमलदार नवनाथ हासबे, माधव बिल्लापट्टे राजेश कंचे, राजू मस्के, तुराब पठाण प्रदीप स्वामी, जमीर शेख, नकुल पाटील यांनी केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.