शेतकर्यांच्या नावावर अधिकारी, कंपनी मालामाल; चौकशी करण्याची शिवसेनेची मागणी
लातूर
शेतकर्यांच्या जिवनात उन्नती व्हावी, शेतीत हरीत क्रांती घडावी, बारामाही शेतीत उत्पादन क्षमता निर्माण हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन माजी मुख्यमंत्री व शिवसेनेेचे पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळात शेतकर्यांना विजेचा वापर पुरेपुर मिळावा या हेतून मुख्यमंत्री कृषी सौर उर्जा योजना ९०/९५ टक्के अनुदानावर चालु करण्यात आली होती. सदर योजनेचा लाभ सिंचन कृषी क्षेत्रासाठी शेतकरी वर्गाला व्हावा, विजेचा लपंडावाला कंटाळलेल्या शेतकर्याला बारामाही शेतीत पाणी देण्याची सोय व्हावी, सदर योजना फलदायी ठरत असल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यमान सरकारने या योजनेची व्याप्ती वाढवून मोठ्या प्रमाणात खाजगी कंपनीला कंत्राट देऊन अंमलात आणली असल्याने या योजनेत लातूर विभागीय महावितरण कार्यालयाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला असून प्रत्यक्षात लाभार्थी शेतकर्यांना त्याचा लाभ न होता यावर ऑनलाईन सिस्टममध्ये हेराफेरी करून योजना मंजूर शेतकरी वेगळा व प्रत्यक्षात लाभ आगाऊ रक्कम घेऊन इतरत्र शेतकर्यांच्या शेतीत हा सौरउर्जापंप बसवण्यात आल्याचा प्रकार निलंगा, शिरूर अनंतपाळ तसेच संपूर्ण जिल्ह्यात झाल्याचा उघडकीस आलेला असून शेतकर्यांच्या नावावर वितरण कंपनी व महावितरण अधिकारी मालामाल झालेले आहेत. या योजनेचा फटका निलंगा विधानसभा मतदार संघातील ५०० शेतकर्यांना बसलेला असून सदर योजनेत लाखो रूपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) निलंगा विधानसभा प्रमुख सोमनाथ स्वामी डिगोळकर यांनी केलेला असून सदरील भ्रष्ट अधिकारी व कंपनी संचालकावर चौकशी करून कार्यवाही करावी अशा मागणीचे निवेदन नुकतेच लातूर महावितरणाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, अधिक्षक अभियंता मदन सांगळे, यांना त्यांच्या कार्यालयात भेटून निवेदन देऊन केली आहे.
सदरील निवेदनात लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शेतकर्यांनी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरलेला होता. त्यानंतर तसा योजना मंजूर झाल्याचा मॅसेज त्यांना प्राप्त झाला. परंतू नंतर कंपनीच्या वतीने त्रुटी दाखून मंजूरी रद्द करून सदर अर्ज परत आयडी नंबर चेंज करून इतर शेतकर्याच्या नावावर सौर पंप मंजूर करून त्यांच्या शेतीत वितरण कंपनीने आगाऊ रक्कम घेऊन बसविण्यात आलेला आहे. शेतकर्यांचा स्वहिस्सा स्वतः कंपनीने भरली, शेतकर्यांच्या सह्या व अधिकार्यांच्या सह्या तसेच स्थळ पंचनामा आणि कार्यालयीन शिक्का ही बनावटीचे आढळतात. सदर योजना वितरण कंपनी व दलाल तसेच संबंधीत महावितरणच्या अधिकार्यांनी एकत्रितपणे मिळून या योजनेत लाखोचा घोटाळा करून शासनाला एका पंप जोडणीसाठी साडेतीन लाखाचा चुना लावला असून शेतकर्यांच्या नावे दलाली करून अधिकारी व कंपनी हे मालामाल झाले असल्याचे या प्रकरणावरून स्पष्ट होत आहे.
सदर योजना मंजूर झालेले व वर्षानुवर्षे योजनेच्या लाभासाठी प्रतिक्षेत असलेले शेतकरी बांधवांना या योजनेचा फटका बसलेला असून संंबंधीत शेतकरी बांधवांनी न्यायासाठी शिवसेेनेकडे धाव घेतलेली होती. या बाबतची सत्य परिस्थिती पाहण्यासाठी शिवसेनेच्या टिमने प्रत्यक्ष शेतकर्याच्या शेतीबांधावर जाऊन चौकशी केली असता सदर घोटाळ्याची व्याप्ती फार मोठी असल्याचे समजते व शेतकर्याची फासवणुक केल्याचे दिसते. ही बाब म्हणजे शेतकरी बांधवांच्या टाळूवरचे लोणी खाणारे महावितरणचे भ्रष्ट अधिकारी व पुरवठा करणारी वितरण कंपनी यांची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेली असून एक महिन्याच्या आता शेतकर्यांना मंजूर असलेला सौर उजार्र् कृषी पंप संबंधीत शेतीत नाही बसविल्यास तसा निर्णय शासन व प्रशासनाने न घेतल्यास भविष्यात शिवसेना स्टाईनलने महावितरणच्या कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा महावितरणाला देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. सदर निवेदनावर शिवसेनेचे निलंगा निधानसभा प्रमुख सोमनाथ स्वामी डिगोळकर, जेष्ठ शिवसैनिक त्र्यंबक गुरूनाथ स्वामी लातूर, शेतकरी प्रतिनिधी म्हणून दत्तात्रय लोभे निलंगा यांच्या स्वाक्षर्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.