वार्तांकन करताना पत्रकारांनी सत्याची कास धरावी दर्पण दिन कार्यक्रमात राजू पाटील

 वार्तांकन करताना पत्रकारांनी सत्याची कास धरावी दर्पण दिन कार्यक्रमात राजू पाटील




 


औसा प्रतिनिधी

 काळानुसार पत्रकारिता क्षेत्रामध्ये फार मोठे परिवर्तन निर्माण झाले असून प्रचलित काळामध्ये पत्रकारिता क्षेत्रांमध्ये टिकून राहणे खूप कठीण झाले आहे वार्तांकन करीत असताना पत्रकारांनी सत्याची कास धरावी बातमी मधील सत्य जनतेसमोर आलेच पाहिजे याची दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मराठी पत्रकारितेने चळवळीमध्ये मोलाचे योगदान दिले होते आजच्या काळामध्ये प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यामध्ये खूप मोठी तफावत निर्माण झाली असून सर्वसामान्य नागरिक सुद्धा कार्यक्रमाच्या बातम्या समाज माध्यमातून प्रसारित करीत आहेत म्हणून पत्रकारांनी पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करत असताना सत्याची साथ कधीही सोडू नये असे प्रतिपादन संपादक राजू पाटील यांनी केले

 औसा तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित दर्पण दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले पत्रकार राम कांबळे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सपत्नीक सत्कार औसा तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांना वार्तांकन करण्यासाठी डायरी पेन आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगरे सचिव महेबूब बक्षी उपाध्यक्ष बालाजी उबाळे व रोहित हंचाटे, सहसचिव विनायक मोरे कोषाध्यक्ष इलियास चौधरी, रमेश दुरूकर, एस ए काजी, कल्याण जंगले, मुक्तार मणियार,मझहर पटेल, गिरीधर जंगाले,बाळासाहेब कुलकर्णी, गिरीधर जंगाले, माजी न प सदस्या तथा औसा तालुका दक्षता समितीच्या सदस्या सौ प्रमिला कांबळे जानीमिया  पटेल आदी मान्यवर उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या