कमी दरात घर मिळणे ही संकल्पना महत्त्वाची ः जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा घुगे - ठाकूर

 कमी दरात घर मिळणे ही संकल्पना महत्त्वाची ः जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा घुगे - ठाकूर







लातूर ः रोटी, कपडा और मकान हा मानवाचा अविभाज्य घटक आहे. ती पूर्ण करण्याची जबाबदारी बांधकाम व्यावसायिकांनी विश्वासाने पूर्ण करावी. त्यासाठी आपण त्यांच्या कायम पाठिशी राहू. सर्वसामान्यांना प्रशिक्षित बांधकाम व्यावसायिकांकडून दर्जेदार व कमी दरात घरे उपलब्ध करून देण्याची संकल्पना अमलात आणावी व सर्वसामान्यांना परवडतील अशी घरे उपलब्ध करून द्यावीत, असे जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा घुगे - ठाकूर यांनी क्रेडाईच्या माध्यमातून आयोजित बांधकाम कामगार कल्याणकारी योजना अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात बोलताना केले. या वेळी सहायक कामगार आयुक्त मंगेश झोले, अभिनव साळुंके, क्रेडाईचे अध्यक्ष जगदीश कुलकर्णी, प्रकल्प अध्यक्ष विष्णु मदने, सचिव संतोष हत्ते यांच्यासह क्रेडाईचे आजी - माजी पदाधिकारी उपस्थित होते.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. विष्णु मदने यांनी या प्रकल्पाच्या आयोजनाबाबत प्रास्ताविक केले. तर जगदीश कुलकर्णी व वुमन विंग्जच्या सौ. जयनंदा गित्ते यांनी जिल्हाधिकारी श्रीमती घुगे - ठाकूर यांचा सत्कार केला. संतोष हत्ते यांच्या हस्ते सहायक कामगार आयुक्त मंगेश झोले यांचाही सत्कार करण्यात आला. क्रेडाईचे अध्यक्ष जगदीश कुलकर्णी यांनी या उपक्रमामागील प्रास्ताविक करून क्रेडाईचे कार्य व पुढील दिशा याबाबत मनोगत व्यक्त केले. कामगार व कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाल्या, मराठवाड्यात गुणवत्ता आहे. लातुरातील बांधकाम व्यावसायिकांनी कामगार कल्याणकारी योजनेसाठी अतिशय चांगला उपक्रम हाती घेतला असून, बांधकामाबाबत आपले वेगळे नाते आहे. मी सुरवातीला संभाजीनगर येथे म्हाडा प्रकल्पाअंतर्गत बांधकाम व्यवसायाशी निगडित काम केले आहे. त्यामुळे या कामाबद्दल मला व्यक्तिशः आकर्षण आहे. बांधकाम व्यावसायिकाच्या अडचणी व त्यावरील उपाय याबद्दल आपण जिल्हाधिकारी म्हणून कायम सहकार्य करू. बांधकाम व्यावसायिकाची गुणवत्ता व विश्वासार्हता टिकवून ठेवावी व सर्वसामान्य ग्राहकांना परवडतील अशी स्वस्त घरे उपलब्ध करून द्यावीत. त्यासाठी कमीत कमी खर्चात नवीन दर्जाचा वापर होणे गरजेचे आहे. लातूर हे भूकंपप्रवण क्षेत्र असल्याने लातुरातील बांधकामे ही भूकंपरोधक असली पाहिजेत, याचीही बांधकाम व्यावसायिकांनी काळजी घ्यावी. पुणे - मुंबईपेक्षाही लातुरातील भूकंपग्रस्त भागातील लोकांचे काम चांगले व दर्जेदार आहे. त्यामुळे ज्या ज्या वेळी भूकंपाचा प्रश्न येईल त्या त्या वेळी लातूरकर म्हणून त्यांची गुणवत्ता निश्चितच वाखाणण्याजोगी राहील. क्रेडाईने असेच समाजोपयोगी कार्यक्रम हाती घ्यावेत, यापुढील कार्यक्रमातही आपल्याला सहभागी होण्यास आवडेल, असे सांगून शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने उपस्थित कामगारांना सुरक्षा कीटचे वाटप करण्यात आले.
सहायक कामगार आयुक्त मंगेश झोले यांनी लातूर येथील कामगारांना मिळणाऱ्या सोयी व सवलतीबाबत माहिती दिली. तसेच लातूर जिल्ह्यात रजिस्ट्रेशन करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांची संख्या अत्यल्प असून जास्तीत जास्त नागरिकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी क्रेडाईचे माजी अध्यक्ष सुबोध बेळंबे, दीपक कोटलवार, उदय पाटील, श्रीकांत हिरेमठ, अमोल मुळे, नागनाथ गित्ते, विष्णू मदने व त्यांच्या टीमने या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. क्रेडाईचे सचिव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या