रस्ता सुरक्षा अभियान-2024 निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.*



*रस्ता सुरक्षा अभियान-2024 निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.*



 लातूर (प्रतिनिधी )रस्ता सुरक्षा अभियान अभियान-2024 हा दिनांक 15 जानेवारी 2024 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत राष्ट्र व राज्याचे वतीने साजरा करण्यात येत आहे. त्यात लातूर पोलीस मार्फतीने वाहतुक अनुषंगाने सामाजीक बांधिलकीचे उपक्रम राबविले जात आहेत.त्याचाच एक भाग म्हणुन दिनांक 04/02/2024 रोजी सकाळी 09:00 वा. वाहतुक नियंत्रण शाखा, लातूर येथे लातूर पोलीस व इंडियन मेडीकल असोशिएशन, लातूर यांचे संयुक्त विद्यमानाने अँटोरिक्षा, काळी पिवळी टॅक्सी, ट्रॅव्हल्स, माल वाहतुक करणारे वाहन चालकांसाठी "नेत्र तपासणी, रक्त तपासणी, ईसीजी, अस्थिरोग इत्यादी आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर" घेण्यात येत आहे. 
        सदर शिबीराकरीता मोठ्या संख्येने अटोरिक्षा, काळी पिवळी टॅक्सी, ट्रॅव्हल्स, माल वाहतुक करणारे वाहन चालकांनी नोंदणी करुन मोफत तपासणीचा लाभ घ्यावा. असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात येत आहे. सदर शिबीरात येणारे अटोरिक्षा, काळी पिवळी टॅक्सी, ट्रॅव्हल्स, माल वाहतुक करणारे वाहन चालकांची मानांकित दर्जाचे एमडी, एमबीबीएस डॉक्टर्स तपासणी करुन मार्गदर्शन व उपाय सुचविणार आहेत. यात इंडियन मेडीकल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. श्री.अनिल राठी व त्यांची डॉक्टर्स टिम असे शिबीरात तपासणीस असणार आहेत.
               यासंदर्भात लातूर शहरातील विविध वाहन संघटनांचे प्रतीनिधी, अॅटोरिक्षा, काळी पिवळी टॅक्सी, ट्रॅव्हल्स, माल वाहतुक करणारे वाहन चालक यांच्या बैठका घेण्यात येत आहेत.
               दि. 04/02/2024 रोजीचे "नेत्र तपासणी, रक्त तपासणी, ईसीजी, अस्थिरोग इत्यादी आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर" कामी पदाधिकारी यांनी त्यांचे अॅटोरिक्षा, काळी पिवळी, ट्रॅव्हल्स, माल वाहतुकीचे वाहन चालकांना मोठ्या संख्येने हजर ठेवून वाहन चालकांनी येतेवेळी वाहन चालविण्याचा परवाना व वाहनाचे आरसी बुक घेवून नोंदणी करावी व शिबीराचा लाभ घेण्याबाबत लातूर जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख पोलीस अधिक्षक श्री. सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर श्री भागवत फूंदे,वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश कदम यांनी आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या