चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला बीड जिल्ह्यातून अटक. कॉपर चोरीचे तीन गुन्हे उघड. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.*

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला बीड जिल्ह्यातून अटक. कॉपर चोरीचे तीन गुन्हे उघड. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.*


  लातूर (प्रतिनिधी )या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.
               पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे प्रयत्न सुरू होते .त्या अनुषंगाने सदर पथक माहितीचे संकलन करीत असताना,माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे घडलेल्या कॉपर चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार हा बीड येथील खासबाग मध्ये राहणारा असून त्यांने त्याच्या इतर साथीदारासह सदरचा गुन्हा केला आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने दिनांक 30/01/2024 रोजी 11:00 वाजण्याच्या सुमारास सदर पथक तात्काळ बीड शहरातील खासबाग परिसरामध्ये पोचून आरोपीला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव 

1) सलमान सादिक शेख, वय 22 वर्ष, धंदा ड्रायव्हर, राहणार खासबाग, बीड
असे असल्याचे सांगितले.

                 तसेच त्याच्याकडे गुन्ह्याच्या संदर्भाने विचारपूस केली असता त्याने सांगितले कि, काही महिन्यापूर्वी लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी त्याच्या इतर साथीदारासह मिळून रात्रीच्या वेळी कॉपर चोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले. तसेच चोरी केलेल्या गुन्ह्यामध्ये त्याच्या वाट्याला आलेले व घराच्या खोलीमध्ये लपवून ठेवलेले वेगवेगळ्या प्रकारचे कॉपरचे साहित्य काढून दिले. त्याची पाहणी केली असता सदरचे साहित्य पोलीस ठाणे चाकूर भादा व लातूर ग्रामीण हद्दीतून चोरलेले असल्याचे निष्पन्न झाले.
               त्यावरून नमूद आरोपीला त्यांने वरील पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरी केलेल्या मुद्देमालसह ताब्यात घेण्यात आले.
               पोलीस ठाणे चाकूर, भादा व लातूर ग्रामीण येथील प्रत्येकी एक गुन्हा असे एकूण तीन कॉपर चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. 
             नमूद आरोपीला पुढील कार्यवाहीस्तव पोलीस ठाणे चाकूर च्या ताब्यात देण्यात आले असून संबंधित पोलीस ठाणेचे पोलीस पुढील तपास करीत आहेत.फरार तीन आरोपींचा शोध सुरू आहे.
                सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड, विश्वंभर पल्लेवाड, पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार रियाज सौदागर, योगेश गायकवाड, राजेश कंचे, मोहन सुरवसे, संतोष खांडेकर, चंद्रकांत केंद्रे यांनी पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या