शासकीय माध्यमिक आश्रमशाळा राईनपाडा येथे अनेक प्रशासकीय अधिकारी याचे हस्ते परितोषक वितरण सोहळा संपन्न व दहावीच्या विध्यार्थीचा निरोप समारंभ,

*शासकीय माध्यमिक आश्रमशाळा राईनपाडा येथे अनेक प्रशासकीय अधिकारी याचे हस्ते परितोषक वितरण सोहळा संपन्न व दहावीच्या विध्यार्थीचा निरोप समारंभ,


धुळे प्रतिनिधी:-लक्ष्मण कांबळे

 ता.साक्री जि.धुळे येथे नुकताच वार्षिक पारितोषिक वितरण, शबरी विद्यार्थी बँक,आय.सी.टी. लॅबचे उद्घाटन व दहावी विध्यार्थी निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न मा.श्री.प्रमोद पाटील प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.पी.के.ठाकरे सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण,श्री.मनोज पाटील सहाय्यक प्रकल्प अधिकारी विकास,श्री.भटू आव्हाड शिक्षण विस्तार अधिकारी, श्री.सतीश काकड शिक्षण विस्तार अधिकारी धुळे हजर होते.याप्रसंगी लेझीम झांज पथकने स्वागत करण्यात आले.यावेळी शबरी विद्यार्थिनी बँकचे उद्घाटन मुलींच्या वस्तीगृहात व शालेय इमारती आय.सी.टी.लॅबचे उद्घाटन व आश्रमशाळेचा सातवीचा विद्यार्थी प्रदीप जालीम मावळी इयत्ता 7वी याने राईनपाडा आश्रमशाळेची प्रतिकृती रेखाटलेली होती.त्याचे अनावरण प्रकल्प अधिकारी मा.श्री.प्रमोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी फिरते वाचनालय.डिजिटल क्लासरूम,वाचनालय वृक्षारोपण,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,राज्यस्तरीय प्राविण्य प्राप्त खेळाडूंचा सत्कार,आश्रम शाळेत वर्षभर सर्वात जास्त दिवस उपस्थित असलेले विद्यार्थी पहिली ते दहावी यांचा सत्कार व बक्षीस वितरण तसेच आश्रमशाळेत हरवलेल्या वस्तू प्रामाणिकपणे परत करणारे विद्यार्थी यांचा सत्कार व सन्मान करून विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली.आदर्श शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सन्मानित करण्यात आले. दहावीच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.शाळेत व सहशालेय उपक्रमातील सहभागी होणारे व प्राविण्य मिळवणारे गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार व वार्षिक बक्षीस वितरण करण्यात आले. दहावीच्या विद्यार्थ्यीनींनी गीत गायन करून निरोप दिला.या वर्षाचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्रदीप जालीम मावळीला देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुभाष जाधव यांनी केले.सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.सुभाष जाधव मुख्याध्यापक यांच्यासह श्री.विजय खैरनार,श्री.मनोज निकम,श्री.चंद्रकांत साळुंखे, श्री.पन्नालाल पाटील, श्रीम.सोनी सूर्यवंशी, श्रीम.कल्पना बागुल,श्री.महालू गांगुर्डे,श्री.कैलास बागुल,श्री. अशोक कूवर,श्री.अनिल चौरे,श्रीम.जागृती वसावे,श्री.महेश जुकले,श्रीम.बंका बहिरम,श्री. विजय बागुल,श्री.प्रवीण कुवर, श्री.प्रितम पिंपळे,श्री.यशवंत गावित,श्री.निलेश गवळी श्रीम.उषा अहिरे,श्रीम.मिना गवळी,श्रीम.विजया देसाई,श्रीम.पुष्पा चौधरी आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.विजय खैरनार यांनी केले तर आभार श्री.महाळू गांगुर्डे यांनी मानले.*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या